Ubed Shaikh Deoni(Latur)

गुरुवार, 23 दिसंबर 2021

Deoni Teachers Group(Ubed Shaikh निर्मित)

┍══════════════┒
║🍁 *देवणी टिचर्स ग्रुप* 🍁.║ ┖══════════════┚
      *_📚दैनिक परिपाठ_*📚
              दि.24/12 /2021
◥◣◢◤◥◣◢◤✴✴◥◣◢◤◥◣◢◤
 *_✍ υвє∂ ѕнαιкн,*
*Α¢нωαℓα т۹-∂єσηι.*
*∂ιѕт-ℓαтυя_*✍
◥◣◢◤◥◣◢◤✴✴◥◣◢◤◥◣◢◤
            *_👫👬राष्ट्रगीत👫👫_*
 *◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*  
            *_👭👬प्रतिज्ञा👭👬_*
*◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*
           *_👫👬संविधान👫👬_*
*◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*
        *_🔰आजचा सुविचार_*🔰

*जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.*
 *࿇ ══━━━━✥◈✥━━━━══ ࿇*  
             *_💦आजची म्हण💦_*

*चालत्या गाडीला खीळ*

*👉अर्थ*

🎤व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
*═══════ ➖ ◖◍◗➖ ═══════*
       *_💥आजचा दिनविशेष_*💥

*महत्त्वाच्या घटना:*

१९९९ : काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.

१९७९ : सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.

१९५१ : लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.

१९४३ : दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.

१९२४ : अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा

१९०६ : रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.

१७७७ : कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.

*➡जन्मदिवस / जयंती / वाढदिवस*:

१९५९ : अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार

१९५७ : हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष

१९२४ : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)

१८९९ : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)

१८८० : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)

१८६४ : विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)

१८१८ : जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)

११६६ : जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)

*➡मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:*

२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

१९८७ : एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)

१९७७ : नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)

वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी
१९७३ : पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)

१५२४ : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९

⫷⫸⫷⫸⫷⫸⫷♐♐⫸⫷⫸⫷⫸⫷⫸  
                       *बोधकथा*
                 
      *सोन्याची अंडी देणारी कोंबडी*

👉एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो. 
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.
एकदा त्याच्या मनात विचार येतो की, ‘कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील’ व आपण जर कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ. या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो खूप उदास होतो कारण कोंबडी मेल्यामुळे त्याला रोज मिळणारे सोन्याचे अंडे मिळणेही बंद झाले.
*तात्पर्य - जेवढे आपल्याला मिळते त्यातच समाधान मानावे, कोणत्याही गोष्टींची जास्त हाव करू नये.*

⫷⫸⫷⫸⫷⫸⫷♐♐⫸⫷⫸⫷⫸⫷⫸  
 *_📰आजच्या ठळक बातम्या_*📰


*═══════➡ ◖◍◗ ➡═══════*
           *_🔱प्रश्नमंजुषा_🔱*

*📘शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य*📘

 *🔰उपकरणाचे नाव -  कार्य*

*व्होल्टमापी* - विजेचा दाब 

*प्रकाशमापी* - प्रकाशाची तीव्रता 

*पर्जन्यमापी* - पर्जन्यमान 

*ज्वरमापी* - शरीराचे तापमान 

*स्टेथेस्कोप* - हृदयाचे ठोके मोजणे 

*होकायंत्र* - उत्तर व इतर दिशा दाखविणे
          
*सुक्ष्ममापी* - सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे 

*वातकूक्कुट* - वार्‍याची दिशा 

*विद्युत जनित्र* - विद्युत प्रवाहाची शक्ती 

*वर्णमापी* - रंगाच्या तीव्रतेतील फरक 

·*परिगणक* - गणिती आकडेवारी 

·*श्रवणमापक* - श्रवणशक्तीतील फरक 

·*दूरमुद्रक* - संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे 

·*गणकयंत्र* - प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे 

·*कॅलरीमापी* - उष्णतेचे प्रमाण 

·*विस्थरीमापी* - द्रव्यपदार्थाचा चिकटपणा 

·*किरण लेखन यंत्र* - सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे 

·*सुक्ष्मदर्शक* - सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे 

·*समतलमापी* - क्षितीज समांतर पातळी मोजणे 

·*विद्युत भारमापी* - विद्युतभाराचे अस्तित्व 

*वायुवेग मापक* - वार्‍याची दिशा आणि भार 

·*दुग्धता मापी* - दुधांची सापेक्ष घनता


_▂ ▃ ▅ ▆ █ Thanks █ ▆ ▅ ▃ ▂_
      *_फलक लेखणासाठी उपयुक्त_*

रविवार, 24 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा चाचणी क्र. 1

https://quizzory.in/id/617501fa74bd913872051b56
👉वरील निळ्या अक्षरावर टच करा व सोडवा चाचणी 
     *📔महाराष्ट्र शिक्षक पॅनल*📔
            सोडवा:-10 प्रश्न 10 गुण

सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी असून आपल्या पाल्याचे सामान्य ज्ञान तपासा
➖➖➖➖➖➖➖➖➖
       *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

शनिवार, 23 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)

                      🏵 जिल्हे निर्मिती🏵


🌈 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

🌈                   औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

🌈 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

🌈    26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

🌈 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

🌈 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

🌈                     अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

🌈 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

  🌈                   भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)

🌈.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)



♦मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
              👉- औरंगाबाद. 

♦· लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? -
              👉 उस्मानाबाद. 

♦· जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? 
              👉- औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? -
              👉   मराठवाडा. 

♦· गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉 औरंगाबाद-जळगाव. 

♦· जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉औरंगाबाद. 

♦· हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉  औरंगाबाद. 

♦· विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
              👉- नांदेड. 

♦· गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? -
              👉 पैठण-औरंगाबाद. 

♦· जायकवाडी जलाशयाचे नाव काय? 
              👉 - नाथसागर. 

♦· बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? -
              👉 राहुरी व औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? 
              👉 - मराठवाडा. 

रविवार, 30 मई 2021

♦स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -21♦


♦म्हणी भाग 21♦

♦सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - कोणत्याही गोष्टीची मर्यादा ठरलेली असतेच. 
 
♦सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा - जवळच्या खूप व्यक्ती आहेत पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. 
 
♦साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे.
 
♦सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही - स्वाभिमानी माणसावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपले तत्व सोडत नाही. 
 
♦सुंटी वाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष कमी होणे.  
 
♦सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तु वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.
 
♦हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे परस्पर दुसर्‍याची वस्तू तिसर्‍याला देणे.
 
♦हसतील त्याचे दात दिसतील - चांगले काम करताना टिंगल करणार्‍यांची पर्वा न करणे.
 
♦हपापाचा माल गपापा - कोणाचे फुकट घेतलेले तसेच जाणे. 
 
♦हत्ती गेला नि शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडासा भाग शिल्लक राहिला. 
 
♦हत्तीच्या पायी येते अन मुंगीच्या पायी जाते - कोणतीही गोष्ट येताना ती खूप लवकर येते पण जाताना मात्र हळूहळू जाते. 
 
♦हाजीर तो वजीर - जो वेळेवर उपस्थित असतो त्याचाच फयदा होतो. 
 
♦हातच्या काकणांला आरसा कशाला? - स्पष्ट असणार्‍या गोष्टीला पुरावा कशाला? 
 
♦हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे (वसे) - दिर्घोद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. 
 
♦ह्या हातचे त्या हातावर - वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
 
♦हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
 

 

 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -20


🩸म्हणी भाग 20🩸

🩸वेळ ना वारी गाढव आले दारी - मूर्खाला योग्य अयोग्य प्रसगाचे भान नसते. 
 
🩸वाघ म्हटले तरी खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच - एखाद्या बरोबर आपण कितीही चांगले वागा पण तो आपला स्वभाव सोडणारच नाही, त्याचा गुण दाखवणारच.
 
🩸शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यावर तो ऐकतो.
 
🩸शेरास सव्वाशेर - एखाद्याचा गर्व कमी करण्यासाठी वरचढ माणूस भेटणे. 
 
🩸शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते.
 
🩸शेंडी तुतो वा पारंबी तुटो - पक्का निश्चय करणे. 
 
🩸शिंक्याचे तुटले नि बोक्याचे फावले - एकाचा तोटा तोच दुसर्‍याचा फायदा होत असतो. 
 
🩸शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी? - आपल्यासाठी अतोनात परिश्रम करताना त्रास सहन केला तरी त्याचा विचार न करता कामातील चुका शोधून काढणे. 
 
🩸सगळे मुसळ केरात - मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यावर घेतलेले सर्व कष्ट वाया जातात. 
 
🩸सत्तेपुढे शहाणपण नाही - अधिकार शक्ती असलेल्या माणसापुढे कुणाचेच काही चालत नाही.
 
🩸साठी बुद्धी नाठी - म्हातारपण आले की बुद्धी चळते विवेकशक्ती कमी होते. 
 
🩸स्वार्थी आले अन शास्त्री गेले - स्वार्थापोटी विव्दता गेली.
 
🩸साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवानाला कशाचीही कमतरता पडत नाही
 
🩸सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी - न होणार्‍या कामाची तयारी प्रारंभापासून करणे. 
 
🩸सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही - जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते
 

 

 

 

 

 

⭕स्पर्धा परीक्षा उपयुक्त (ध्वनीदर्शक शब्द) -1⭕


🩸ध्वनिदर्शक शब्द🩸

🦋प्राणी/पक्षी शब्द🦋
📒वाघाची➡ डरकाळी
📒कोल्हयांची ➡कोल्हेकुई
📒गाईचे➡ हंबरणे
📒गाढवाचे➡ ओरडणे
📒घुबडाचा➡ घूत्कार
📒घोडयाचे➡ किंचाळणे
📒चिमणीची➡ चिवचिव
📒कबुतराचे/पारव्याचे➡ घुमणे
📒कावळ्याची➡ कावकाव
📒सापाचे➡ फुसफुसने
📒हत्तीचे➡ चित्कारणे
📒हंसाचा➡ कलख
📒भुंग्यांचा, मधमाश्यांचा➡ गुंजारव
📒माकडांचा➡ भुभु:कार
📒म्हशींचे➡ रेकणे
📒मोराचा➡ केरकाव 
📒मोरांची➡ कैकावली
📒सिंहाची➡ गर्जना
📒पंखांचा➡ फडफडाट
📒पानांची➡ सळसळ
📒डासांची➡ भुणभुण
📒रक्ताची➡ भळभळ
 

 

शनिवार, 29 मई 2021

*आरोग्य*

 



*हसणे आणि हसवणे आपल्या सवयीमध्ये सामिल करा* 


👉हसत राहिल्याने शरीर आणि मनात उत्साहाचा संचार होतो. मनापासून हसणे तर एखाद्या औषधाप्रमाणेच आहे. हे एका उत्तम टॉनिकचे काम करते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात तणावापासून मुक्ती

मिळविण्या साठी जागोजागी हास्य क्लब बनविले जात आहेत. 


👉बोलताना जितका ऑक्सिजन घेतला जातो, त्यापेक्षा सहापट अधिक ऑक्सिजन हसताना घेतला जातो. म्हणजे नुसत्या हसण्यातून शरीराला जास्त

👉ऑक्सिजन मिळतो. मानसोपचार तज्ज्ञदेखील तणावग्रस्त व्यक्तींना सतत हसत राहण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते हसताना तुमचा मेंदू विचार करू लागतो, की तुम्ही आनंदात आहात. ही प्रक्रिया पूर्ण शरीरात प्रवाहीत होते. आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागते. 


👉तुम्ही हसणे सुरू करतात तेव्हा तुमच्या शरीरात रक्ताभिसरण तीव्र गतीने होतो. तणावातही हसत राहण्याची क्षमता असेल तर दु:खही कमी वाटायला लागतात. 


*हसण्यामुळे इतरही फायदे होतात..*.


*हसताना राग येत नाही.

*हसत राहिल्याने आनंद मिळतो.

*शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो.

*हसण्याने मनात उत्साहाचा संचार होतो.

*ब्लडप्रेशर कमी होते.

*हसणे दु:ख दूर करते.

*हसण्याने शरीरासोबतच मेंदूचाही व्यायाम होतो.


👉हसणे-हसविणे आपल्या सवयीमध्ये सामील करा आणि मग पाहा तणाव तुमच्या आसपासही दृष्टीस पडणार नाही. त्यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

🏵स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-19) 🏵


🏵म्हणी भाग 19🏵

🏵लकडी वाचून मकडी वळत नाही - खोडकरपणा बंद करण्यासाठी सरळ उपाय जमत नाही. तर त्यासाठी कडक शिक्षा करावी लागते. 
 
🏵लेकी बोले सूने लागे - एखाद्याला उद्द्येशून पण दुसर्‍याला लागेल असे बोलणे.
 
🏵लोका संगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण - लोकांना उपदेश द्यायचा पण स्वत:मला तसे वागायचे नाही.
 
🏵वडयाचे तेल वांग्यावर - एकाबदल दुसर्‍याला दोष देणे.
 
🏵वारा पाहून पाठ फिरवणे - परिस्थिती पाहून वर्तन करणे.
 
🏵वळणाचे पाणी वळणावर जाणे - निसर्ग नियमाप्रमाणे वागतो तर माणूस आपल्या संस्कारा प्रमाणे, स्वभावानुसार वागतो. 
 
🏵वराती मागून घोडे - एखादी घटना घडल्यावर मदतीस धावून येणे.
 
🏵वासरात लंगडी गाय शहाणी - निरक्षर माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणारा ही शहाणा ठरतो. 
 
🏵व्यक्ती तितक्या प्रकृती - प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. 
 
🏵व्याप तितका संताप - कामाचा बोजा जेवढा अधिक तेवढी जबाबदारी मोठी असते. 
 
🏵विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर - आवश्यक त्या वस्तु सोबत घेऊन फिरणे. 
 
🏵विशी विद्या तिशी धन - योग्य वेळी केलेला कामाचा कालांतराने फायदा होतोच.
 
🏵वाहत्या गंगेत हात धुणे - परिस्थिती अनुकूल असली की फायदा करून घेणे.
 
🏵वाघाच्या घरी शेळी पाहुणी - चांगला माणूस वाईट मानसाच्या तावडीत सापडतो.
 

 

 

 

 

📗स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-18) 📗


🩸म्हणी भाग 18🩸

🩸यथा राजा तथा प्रजा - प्रमुख किंवा मोठ्या माणसाच्या वर्तणूकीचा प्रभाव सर्व सामन्यावर पडतो.
 
🩸ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या - एखाद्याने केलेला उपदेश न ऐकता पूर्वी प्रमाणेच वागणे 
 
🩸या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे - एखाद्याला फसवणे, बनवाबनवी करणे 
 
🩸यत्न तो देव जाणावा - प्रयत्न करणे महत्वाचे असते. 
 
🩸राईचा पर्वत करणे - एखादी क्षुल्लक गोष्ट अतिशयोक्ती करून सांगणे 
 
🩸राजाला दिवाळी काय अन दसरा काय? - रोजच्याच गोष्टीची नवलाई नसते, सणांचे महत्व काय. 
 
🩸रात्र थोडी सोंगे फार - वेळ थोडा आणि कमी वेळात कामे खूप असणे. 
 
🩸रिकामा न्हावी भिंतीना तुंबडया लावी - उद्योगी माणूस नेहमी प्रयत्न करतो, तो कधीही गप्प बसत नाही.
 
🩸रोज मरे त्याला कोण रडे - नेहमी घडणार्‍या गोष्टी विषयी स्वारस्य वाटत नाही. 
 
🩸लाज नाही मना कोणी काही म्हणा - निर्लज्ज माणूस दुसर्‍याच्या टीकेची पर्वा करत नाही.
 
🩸लाथ मारीन तेथे पाणी काढीन - स्वत:च्या बळावर एखादे काम पूर्ण करण्याची खात्री असणे. 
 
🩸लहान तोंडी मोठा घास - आपली योग्यता नसताना मोठ्यांना सल्ला देणे. 
 
🩸लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याचे गोष्टीचा आपणाला उपयोग नसतो. 
 
🩸लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - बिनफायदाचा आणि निरर्थक उद्योग करणे.
 

 

🌹स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-17) 🌹


📗म्हणी भाग 17📗

📗मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - कोणाच्याही चांगुल पणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये.
 
📗मरावे परी कीर्तीरूपे उरावे - आपल्या नंतरही कीर्ती राहील असे कार्य करावे
 
📗मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला - आपला सन्मान लोकांना सांगावा पण अपमान झाला तर कोणालाही सांगू नये. 
 
📗माकडाच्या हातात कोलीत - विघ्नसंतोषी माणसाला कारभार देणे.
 
📗मनाची नाही पण जनाची तरी - एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल? असा विचार करावा. 
 
📗मनास मानेल तोच सौदा - आपणाला आवडेल तीच गोष्ट करावी. 
 
📗मानला तर देव नाही धोडा - कोणालाही महत्व द्यायचे किंवा न द्यायचे आपल्या मनावर अवलंबून असते.
 
📗मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी - अवघड काम करण्यासाठी कोणीही माणूस तयार होत नाही.
 
📗मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहानपणीच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते. 
 
📗म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात - कितीही अडचण आली तरीही आपली माणसे आपणाला नकोशी होत नाहीत. 
 
📗मोले घातले रडाया नाही आसू नाही माया - मोबदला घेऊन काम करणार्‍यामध्ये खरीखुरी आत्मियता नसते. 
 
📗मौनम सर्वार्थ साधनम - बडबड करण्यापेक्षा गप्पा बसणे सर्वात उत्तम.
 
📗मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव - कष्ट (कर्म) न करता फळ मागण्याची पद्धत
 

 

 

💎स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-16) 💎


⭕म्हणी भाग 16⭕

⭕भरल्या गाडीला सूप जड नाही - मोठ्या कामाबरोबर एखादे लहान काम सहन होउन जाते. 
 
⭕भटाला दिली ओसरी भट हळूहळू पाय पसरी - एखाद्याला आश्रय दिला तर त्यावर समाधान न मानता तो त्याच्या अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. 
 
⭕भरवशाच्या म्हशीला टोणगा (हालगट) - अपेक्षा ज्याच्याबद्दल आहेत, त्याच्याकडून संपूर्ण निराशा. 
 
⭕भरवशाची मोट पाण्यात लॉट - ज्याच्या वर दृढ विश्वास असेल त्यालाच महत्वाचे काम सांगावे. 
 
⭕भित्यापाठी ब्रम्हराक्षस - भित्रा माणूस काही कारण नसताना भितो म्हणून त्याच्यावरच संकटे येतात. 
 
⭕भिकेची हंडी शिंक्यास चढत नाही - अल्पशा प्रयत्नाने उच्च दर्जाचे स्वप्न साकार होत नाहीत. 
 
⭕भीक नको पण कुत्रं आवर - एखाद्याने कार्यात मदत केली नाही तरी चलेले पण त्या कार्यात अडचणी आणू नये अशी अवस्था.
 
⭕भुकेला कोंडा निजेला धोंडा - खूप गरज असली म्हणजे काहीही चालते. 
 
⭕मन जाणे पापा - केलेले पाप दुसर्‍याला कळत नसले तरी ज्याचे त्याला माहीत असतेच. 
 
⭕मनात मांडे पदरात धोंडे - केवळ मनात येऊन जमत नाही तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष काहीच नसणे. 
 
⭕मन राजा मन प्रजा - आदेश देणारे आपले मनच आणि त्याचे पालन करणारेही आपलेच मन असते.
 
⭕मसकरीची होते कुस्करी - थट्टेचा काहीवेळा भयानक वाईट परिणाम होतो.
 

 

 

 

बुधवार, 26 मई 2021

📘स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -15📘



💎बाप तसा बेटा - मुलाच्या अंगी वडिलांचे गुणधर्म व कुटुंबाचे संस्कार येतात. 
 
💎बापाला बाप म्हणेना चुलत्याला काका कसा म्हणेल - जवळच्याचा मान न ठेवणारा इतरांचा मान काय ठेवील. 
 
💎बाप दाखव नाही तर श्राद्ध कर - एखाद्याला आपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करण्यास सांगणे किंवा आपले म्हणणे चुकीचे असल्याचे मान्य करणे. 
 
💎बडा घर पोकळ वासा - दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात संपत्तीचा अभाव.
 
💎बापसे बेटा सवाई - वडीलापेक्षा मुलगा अधिक कर्तबगार.
 
💎बावळी मुद्रा देवळी निद्रा - दिसण्यात बावळट पण व्यवहारचतुर माणूस 
 
💎बुडत्याला काडीचा आधार - घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत ही महत्वाची वाटते. 
 
💎बुडत्याचा पाय खोलात - ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो, त्याला सतत अपयशच येत जाते.
 
💎बैल गेला अन झोपा केला - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. 
 
💎बोलेल तो करेल काय - केवळ बडबड करणार्‍याकडून काहीही होऊ शकत नाही.
 
💎बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - बोलण्याप्रमाणे कृती करणार्‍या माणसाला सन्मानाने वागवावे.
 
💎बाजारात तुरी अन भट भटणीला मारी - उगीचच कल्पनेचा आधाराने भांडण करणे. 
 
💎बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी - बोलून सगळ्यांना आश्चर्यचकित करावयाचे पण खर काहीच नाही.
 

 

 

 

💎स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -14💎


💡म्हणी भाग 14💡

💡पिंडी ते ब्रम्हांडी - एका छोट्या वस्तुत जे आहे तेच मोठ्या वस्तुत आहे. 
 
💡पी हळद अन हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. 

💡पुढे तिखट मागे पोचट - दिसते तसे नसते. 
 
💡पेरले ते उगवते - चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते. 
 
💡पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा - थोड्या मोबदल्यात जास्त काम करून घेणे. 
 
💡पिकते तेथे विकत नाही - निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते. 
 
💡फार (अति) झाले हसू आले - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा चघळली तर तिचे महत्व कमी होते.
 
💡फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय - शासनाचा निर्णय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असलातरी तो मान्य करावाच लागतो. 
 
💡फुल ना फुलाची पाकळी - वास्तविक जितके द्यायला पाहिजे, तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा खूपच कमी देणे. 
 
💡फुले वेचली तेथे गोवर्‍या वेचणे - जेथे ऐश्वर्याचा उपभाग घेतला तेथे वाईट परिस्थिती येणे. 
 
💡फुटका डोळा काजळाने साजरा करावा - स्वत:चा दोष नाहीसा करता येत नसल्यास तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. 
 
💡बळी तो कान पिळी - शक्तिमान माणूस दुसर्‍यावर अधिकार गाजवतो.
 

 

📒स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -13📒


📀म्हणी भाग 13📀

📀निंदकाचे घर असावे शेजारी - निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्याच्यामुळे आपले दोष आपल्याला कळतात. 
 
📀पळसाला पाने तीनच - सगळीकडे परिस्थिती एक सारखीच असणे.
 
📀पर दु:ख शीतळ - दुसर्‍याच्या दु:खाची खरी कल्पना येत नाही.  
 
📀पदरी पडले खोड हसून करावे गोड - स्वीकारलेल्या गोष्टीला नाव न ठेवता हसून समाधान माणने 
 
📀पडत्या फळाची आज्ञा - आपल्या समोरील प्रसंग शिरसावंद्य माणून काम करणे. 
 
📀पाचमुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे. 
 
📀पाचही बोटे सारखी नसतात - सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात. 
 
📀प्रयत्नांती परमेश्वर - कितीही कठीण गोष्ट असली तरी अथक प्रयत्नानंतर ती साध्य होते म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवावे. 
 
📀पालथ्या घड्यावर पाणी - एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे. 
 
📀पाप्याला पंढरपूर आळशेल्याला गंगादूर - श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही. 
 
📀पाय धू तर म्हणे तोंड केवढ्याचे - सांगितलेले काम सोडून नको त्या गोष्टी करणे.
 
📀प्राणावर आले होते:पण शेपटावर निभावले - जिवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचने. 
 
📀पायाची वहाण पायीच बरी - एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक महत्व देऊ नये. 
 
📀पळणार्‍याला एक वाट तर शोधणार्‍याल बारा वाटा - लबाडी करणे फार सोपे पण ती शोधून काढणे खूप कठीण असते. 
 
📀पडलेले शेण माती घेऊन उठते - चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे कितीही जारी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.
 

 

मंगलवार, 25 मई 2021

🏵स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -12🏵


🎱म्हणी भाग 12🎱

🏵नव्याने नऊ दिवस - नवीन गोष्टीचे काही दिवस कौतुक होते.
 
🏵न खात्या देवाला नैवेद्य - ज्याला ज्या गोष्टीची गरज नाही, त्याला ती गोष्ट देणे. 
 
🏵नकटे असावे पण धाकटे नसावे - परिस्थिती बरोबर जुळवून घ्यावे पण हलकेपणा किंवा गौणत्व पत्करू नये. 
 
🏵नावडतीचे मीठ अळणी - आपल्या नावडत्या माणसाने केलेली कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली, तरी ती आपल्याला वाईटच दिसते.
 
🏵नाक दाबले कि तोंड उघडते -एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य त्या दिशेने दबाव आणला कि चुटकी सरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.
 
🏵नाव मोठ लक्षण खोट - बाह्य देखावा आकर्षक, पण कृतीच्या नावाने शून्य.
 
🏵नवी विटी नवे राज्य - सगळीच परिस्थिती नवीन असणे. 
 
🏵नाचता येईना अंगण वाकडे - एखादी गोष्ट स्वत:ला नीट करता येत नसेल, तर मान्य न करता त्याचा दोष इतर गोष्टीवर ढकलणे. 
 
🏵नाकापेक्षा मोती जड - दुय्यम दर्जाच्या व्यक्तीला प्रमुख पाहुण्यापेक्षा अधिक महत्व प्राप्त होणे. 
 
🏵नाव सोनुताई हाती कथळाचा वाळा नाही - नाव मोठे पण कर्तुत्व कमी प्रतीचे.
 
🏵नाव मोठे पण लक्षण खोटे - भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी 
 
🏵नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे - एखाद्याला लुटून दुसर्‍याला दान करणे. 
 
🏵नळी फुंकली सोनारे इकडून गेले तिकडे वारे - केलेला उपदेश वाया जाणे.
 

 

 

⭕स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -11⭕


🏉म्हणी भाग 11🏉

दुरून डोंगर साजरे - दुरून चांगल्या दिसणार्‍या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते. 
 
दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही - दुसर्‍याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो. पण स्वत:च्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. 
 
दुष्काळात तेरावा महिना - अगोदरच्या संकटात आणखी भर 
 
देव तारी त्याला कोण मारी - देव ज्यांचा पाठीराखा आहे त्यांचे नुकसान कोणीही करू शकणार नाही.
 
 
देश तसा वेश - जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वर्तन करणे. 
 
दैव देते पण कर्म नेते - नशिबामुळे प्रगती होते पण स्वत:च्या चुकीमुळे र्हास होणे.
 
दैव उपाशी राही उद्योग पोटभर खाई - नशिबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ 
 
देह देवळात चित्त (पायतानात) खेटरात - आध्यात्मिक कार्यात शरीराने सहभागी झाले, तरी मन मात्र ऐहिक संसारात गुंतलेले असणे. 
 
दुनिका झुकती हैl झुकानेवाला चाहिएl - लोकांना मूर्ख बनविणारा एखादा ठकसेन असला तर फसणारे अनेकजण या जगात आहेत. 
 
धर्म करता, कर्म उभे राहते - एखादी चांगली गोष्ट करायला गेले तर त्यातून नको ती समस्या उभी राहते.
 
धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. 
 
न कर्त्याचा वार शनिवार - न करायचे काम कारण सांगूण टाळून टाकणे.
 
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न - दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.
 
नखाने काम होते त्याला कुर्‍हाड कशाला - काम अल्पशा धनाने, कष्टाने होते तेव्हा तेथे मोठी शक्ती किंवा श्रम कशाला लावायचे.
 

 

 

🎛स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -10🎛


🎛म्हणी भाग 10🎛

🎛तहान लागल्यावर विहीर खोदणे - जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज वाटली तेव्हा ती मिळवण्याची तयारी करणे. 
 
🎛थांबला तो संपला - जो कोणताही कामधंदा करत नाही त्याची अधोगतीच होते. 
 
🎛थेंब थेंब तळे साचे - हळूहळू वस्तूचा संग्रह केला तर कालतंराने वस्तुंचा मोठा साठा (संचय) होतो. 
 
🎛थोरा घरचे श्वान त्याला सर्वही देती मान - मोठ्या माणसाचा आश्रय घेणार्‍याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. 
 
🎛दाम करी काम - पैशाने सर्व कामे साध्य होतात. 
 
🎛दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते. 
 
🎛दही खाऊकी मही खाऊ - हे करू कि ते करू अशी व्दिधा परिस्थिती 
 
🎛दस कि लकडी एक का बोझा - प्रत्येकाने थोडाफार हातभार लावल्यास सर्वाच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. 
 
🎛दृष्टी आड सृष्टी - आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. 
 
🎛दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत - एखादी गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. 
 
🎛दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसात देखील दोष असतो. 
 
🎛दिवस बुडाला, मजूर उडाला - विशिष्ट वेळेतच काम करणे.
 
🎛दिल्ली तो बहुत दूर है - झालेल्या कामाच्या मानानेखूप साध्य करावयाचे बाकी असणे. 
 
🎛दिल चंगा तो कथौडी में गंगा - आपले अंत:करण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते.
 

 

 

🩸स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -9🩸


🔮म्हणी भाग 9🔮

🔮जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
 
🔮जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी - मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
 
🔮झाकली मूठ सव्वा लाखाची - व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. 
 
🔮टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. 
 
🔮टिटवी देखील समुद्र आटविते - सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. 
 
🔮डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक आणि उपचार दुसराच.
 
🔮डोंगर पोखरून उंदीर काढणे - प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे. 
 
🔮तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला - भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे. 
 
🔮तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. 
 
🔮ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला - वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. 
 
🔮ताकापुरते रामायण - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
 
🔮तोंड दाबून बुक्यांचा मार - एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. 
 
🔮तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले - फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
 

 

🧿स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -8🧿


🧿म्हणी भाग 8🧿

🧿चोराच्या उलटया बोंबा - स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
 
🧿चोराच्या मनात चांदणे - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. 
 
🧿चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
 
🧿जळत्या घराचा पोळता वासा - प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. 
 
🧿जलात राहुन माशांशी वैर करू नये - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये. 
 
🧿जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला - निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते. 
 
🧿जळत घर भाड्याने कोण घेणार - नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. 
 
🧿जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. 
 
🧿ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
 
🧿ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट - जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
 
🧿जशी देणावळ तशी धुणावळ - मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. 
 
🧿ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. 
 
🧿जी खोड बाळ ती जन्मकळा - लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. 
 
🧿ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
 

 

 

🦋स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -7🦋


📼म्हणी भाग 7📼

📼गोगलगाय नि पोटात पाय - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. 
 
📼गोरागोमटा कपाळ करंटा - दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. 
 
📼घर ना दार देवळी बिर्‍हाड - बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती. 
 
📼घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. 
 
📼घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे. 
 
📼घर पहावे बांधून लग्न पहावे करून - अनुभवाने माणूस शहाणा होतो. 
 
📼घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते - आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. 
 
📼घरोघरी मातीच्याच चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. 
 
📼घोडे खाई भाडे - धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. 
 
📼चढेल तो पडेल - गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. 
 
📼चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे. 
 
📼चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही - लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. 
 
📼चिंती परा येई घरा - दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते. 
 
📼चोर सोडून सान्याशाला फाशी - खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
 

 

🌄स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -6🌄


🌄म्हणी भाग 6   🌄 

🌄खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते. 
 
🌄गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
 
🌄गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. 
 
🌄गरज सरो नि वैद्य मरो - आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. 
 
🌄गर्जेल तो पडेल काय - केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. 
 
🌄गाढवाला गुळाची चव काय - मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
 
🌄गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.
 
🌄गाव करी ते राव ना करी - श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. 
 
🌄गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. 
 
🌄गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता - मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. 
 
🌄गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे. 
 
🌄गाढवाच्या पाठीवर गोणी - एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. 
 
🌄गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. 
 
🌄गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य - ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
 

 

 

 

🎯स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -5🎯


📗म्हणी भाग 5📗

📗कावळा बसायला अन फांदी तुटायला - परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
 
📗कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच - कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही. 
 
📗कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे - रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
 
📗कोल्हा काकडीला राजी - क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
 
📗कोरड्याबरोबर ओले ही जळते - निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे.
 
📗कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही - निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. 
 
📗काखेत कळसा नि गावाला वळसा - हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
 
📗कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
 
📗खाण तशी माती - आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
 
📗खर्‍याला मरण नाही - खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
 
📗खाऊ जाणे ते पचवू जाणे - एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
 
📗खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. 
 
📗खाऊन माजवे टाकून माजू नये - पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.
 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -4


💥म्हणी भाग 4💥

💥एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत - दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविदाने नांदू शकत नाहीत दोन सवती एका घरात सुखासमाधानाने राहू शकत नाहीत. 
 
💥ओळखीचा चोर जीवे न सोडी - ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा धोकादायक असतो.
 
💥कर नाही त्याला डर कशाला - ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे 
 
💥कामापुरता मामा ताकापुरती आजी - आपले काम करून घेईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे. 
 
💥काळ आला होता. पण वेळ आली नव्हती - नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. 
 
💥कानामगून आली आणि तिखट झाली - मागून येऊन वरचढ होणे. 
 
💥करावे तसे भरावे - जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते.
 
💥कधी गाडीवर नाव तर कधी नावेवर गाडी - कधी गरीबी तर कधी श्रीमंती येणे.
 
💥कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ - आपलाच माणूस आपल्या नाशाला कारणीभूत होतो. 
 
💥काठी मारल्याने पानी दुभंगत नाही - रक्ताचे नाते तोडून म्हणता तुटत नाही. 
 
💥कडू कारले तुपात तळले सारखरेत घोळले तरीही कडू ते कडूच - किती ही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव (दूर्वर्तणी) बदलत नाही. 
 
💥कुडी तशी पुडी - देहाप्रमाणे आहार असतो. 
 
💥कधी तुपाशी तर कधी उपाशी - संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते.
 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -3


   🔰म्हणी भाग 3🔰

*_🔰इच्छा तेथे मार्ग_* 
👉- एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच. 
 
*_🔰इकडे आड तिकडे विहीर_*
👉- दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती असणे. 
 
*_🔰उठता लाथ बसता बुकी_* 
👉- प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. 
 
*_🔰उडत्या पाखरची पिसे मोजणे_* 
👉- अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे. 
 
*_🔰उधारीचे पोते सव्वाहात रिते_* 
👉- उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो. 
 
*_🔰उंदराला मांजर साक्ष_* 
👉- वाईट कृत्य करतांना एकमेकांना साक्ष देणे.
 
*_🔰उचलली जीभ लावली टाळ्याला_*
- विचार न करता बोलणे.
 
*_🔰उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग_*
👉- प्रसंगी हास्यास्पद ठरेल आशा प्रकराच्या उतावळेपणा दाखविणे. 
 
*_🔰उथळ पाण्याला खळखळाट फार-*
👉 - थोडासा गुण अंगी असणारा माणूस जास्त बढाई मरतो. 
 
*_🔰उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये_*
👉- कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. 
 
*_🔰एक ना घड भारभर चिंध्या_* 
👉- एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था. 
 
*_🔰एका माळेचे मणी_* 
👉- सगळीच माणसे सारख्या स्वभावाची. 
 
*_🔰एका हाताने टाळी वाजत नाही_*
👉- दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.
 
*_🔰ऐकावे जनाचे करावे मनाचे_* 
👉- लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.
 

 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -2


    ⭕म्हणी भाग 2⭕

⭕आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. 
 
⭕आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. 
 
⭕आईचा काळ बायकोचा मवाळ - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
 
⭕आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. 
 
⭕आपलेच दात आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. 
 
⭕अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. 
 
⭕आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. 
 
⭕आलीया भोगाशी असावे सादर - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
 
 
⭕अचाट खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
 
 
⭕आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते - अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
 
 
⭕आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. 
 
⭕आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं - स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. 
 
⭕अळी मिळी गुप चिळी - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. 
 
⭕अहो रूपम अहो ध्वनी - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -1


📓म्हणी भाग 1📓

🕳अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. 
 
🕳आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.
 
🕳अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. 
 
🕳आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.
 
🕳आईजीच्या जीवावर बाईजी उदार - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे.
 
 
🕳आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. 
 
🕳आंधळे दळते कुत्रं पीठ खाते - एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा. 
 
🕳आधी पोटोबा मग विठ्ठोबा - आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. 
 
🕳अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.
 
 
🕳आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. 
 
🕳अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. 
 
🕳आधी शिदोरी मग जेजूरी - आधी भोजन मग देवपूजा 
 
🕳असतील शिते तर जमतील भुते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.
 

 

 

रविवार, 23 मई 2021

🦋स्पर्धा परीक्षा उपयुक्त (कवी साहित्यिक टोपणनावे) 🦋


📗कवी - साहित्यिक टोपण नावे📗

🎯कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

🎯गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर

🎯त्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी

🎯प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

🎯राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज

🎯विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज

🎯निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम

🎯माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन

🎯चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू

🎯आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (भारतातील सर्वात पहिली महिला)




📕भारतातील सर्वात पहिली महिला :📕

* ♦प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील

* ♦महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू

* ♦महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)

* ♦पंतप्रधान- इंदिरा गांधी

* ♦महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित

* ♦मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी

* ♦पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल

* ♦दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान

* ♦भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा

* ♦युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित

* ♦उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी

* ♦भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी

* ♦पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)

* ♦पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.

 

 

⭕स्पर्धा परीक्षा उपयुक्त (प्रमुख व्यक्तीची प्रचलित नावे) ⭕


📕प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे📕

१) शांतीदूत -- पंडित नेहरू

२) मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

३) कैद-ए-आजम -- बॅ. जीना

४) शहीद-ए-आलम -- भगतसिंग

५) लोकनायक -- बापूजी अणे

६) भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

७) गान कोकिळा -- लता मंगेशकर

८) हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद

९) आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

१०) गरिबांचे कैवारी -- के. कामराज

११) प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

१२) देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

१३) भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

१४) बा -- कस्तुरबा गांधी

१५) पंजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग

१६) विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

१७) विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

१८) समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

१९) भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

२०) हार्मिट ऑफ सिमला -- ए. ओ. ह्यू

२१) म्हातारपाखडीचा -- मॅझिनी जोसेफ बॅप्टीस्टा

२२) राजर्षी -- पुरुषोत्तमदास टंडन

२३) महानामा -- मदनमोहन मालवीय

२४) वंगबंधू -- शेख मुजीबर रहमान

२५) विजी -- विजयनगरचे महाराज

२६) राष्ट्रभक्तांधील राजपुत्र -- डॉ. घनश्यामदास बिर्ला

२७) पख्तुन -- खान खान अब्दुल गफ्फार खान

२८) लोकमान्यकार -- कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

 

 

शनिवार, 22 मई 2021

📡स्पर्धा परीक्षा उपयुक्त(जगातील कांही देशांच्या संसदगृहाची नावे) 📡


* ऑस्ट्रेलिया - फेडरल असेम्ब्ली 

* भारत - लोकसभा संसद 

* बांग्लादेश - जातीय संसद 

* ब्राझील - नॅशनल काँग्रेस 

* इंग्लंड - पार्लमेंट 

* कॅनडा - पार्लमेंट 

* चीन - नॅशनल पीपल्स काँग्रेस 

* फ्रान्स - नॅशनल असेम्ब्ली 

* इंडोनेशिया - पिपल्स कन्सलटेटिव्ह असेम्ब्ली 

* जपान - डाएट 

* नेपाळ - राष्ट्रीय पंचायत 

* रशिया - डयूमा व फेडरल कौन्सिल 

* अमेरिका - काँग्रेस 

* स्वीडन - रिक्सडग

📥स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-10) 📥


शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 10 बद्दल माहिती

कामात तत्पर असलेला - कार्यतत्पर 
 
कार्यात गढून गेलेला - कार्यमग्न, कार्यरत
 
इच्छित वस्तु देणारी काल्पनिक गाय - कामधेनू 
 
कोणत्याही क्षेत्रामध्ये अचानक होणारा मोठा बदल - क्रांती 
 
कविता गाऊन दाखवणारी - काव्यगायिका 
 
खोटी तक्रार करणारा - कांगावाखोर 
 
हिताची गुप्त गोष्ट - कानगोष्ट, हितगुज 
 
कुटुंबाच्या पारंपारिक धार्मिक प्रथा व परंपरा - कुलाचार 
 
कुंजात विहार करणारा - कुंजविहारी 
 
मडकी तयार करणारा - कुंभार
 
कथा लिहिणारा - कथा लेखक, कथाकार 
 
धान्य किंवा तशा वस्तु साठविण्याची जागा - कोठार 
 
मनातल्या मनात होणारा त्रास - कोंडमारा 
 
ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा - कोट्याधीश 
 
किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा - खंदक 
 
आकाशगमन करणारा - खग, पक्षी

📥स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-9) 📥



📒कलेची आवड असणारा - कलासक्त, कलाप्रेमी
 
📒कमळासारखे डोळे आहेत अशी - कमलनयना, कमलाक्षी
 
📒इच्छेलेले पूर्ण करणारा वृक्ष - कल्पवृक्ष 
 
📒आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवणारा - कर्तव्यपराडमुख 
 
📒ऐकताना कानाला गोड वाटणारा - कर्णमधुर 
 
📒केलेले उपकार जानणारा - कृतज्ञ
 
📒केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न 
 
📒कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा - कर्तव्यदक्ष 
 
📒अंधार्‍या रात्रीचा पंधरवडा - कृष्णपक्ष, वद्यपक्ष 
 
📒अंगात एखादी कला असणारा - कलावंत, कलाकार 
 
📒कष्टाने मिळणारी गोष्ट - कष्टसाध्य 
 
📒भाकरी करण्याचे लाकडी पसरट पात्र - काटवट, काथवट 
 
📒हाताची सांकेतिक किंवा खाणाखुणांची भाषा - करपल्लवी 
 
📒कार्य करण्यास सक्षम असलेला - कार्यक्षम 
 
📒कामामध्ये टाळटाळ करणारा - कामचुकार

📥स्पर्धा परीक्षा उपयुक्त(शब्दसमूहाबद्दल एक शब्द-7) 📥


📌शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 7 बद्दल माहिती📌

ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती - आदर्श 
 
जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय - इतिकर्तव्यता 
 
शत्रूची आपल्याला अनुकूल अशी कृती - इष्टापती 
 
सूर्याचे उत्तरेकडे जाणे - उत्तरायण 
 
शापापासून सुटका - उ:शाप 
 
जमिनीवर व पाण्यावर या दोन्हीही ठिकाणी राहणारा प्राणी - उभयचर 
 
आजारी माणसाच्या अंगावर आजाराला उत्तार पडावा म्हणून मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी - उदकशांती
 
 
शेतीची हद्द दाखवण्यासाठी घातलेला बांध - उरोळी
 
मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर - उपनगर 
 
हळूहळू घडून येणारा बदल - उत्क्रांती 
 
शिल्लक असलेले - उर्वरित 
 
उद्याला येत आहे असा - उद्योन्मुख 
 
ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा - उपकृत 
 
नदी जेथून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण - उगम

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-6)


💥शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 6 बद्दल माहिती💥

➡जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे - आभास
 
➡ज्याला मरण नाही असा - अमर 
 
➡कमी वेळ टिकणारा - अल्पजीवी 
 
➡कमी आयुष्य असणारा - अल्पसंतुष्ट 
 
➡ज्याचा विसर पडणार नाही - अविस्मरणीय 
 
➡शब्दामधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे - अवर्णनीय 
 
➡ज्याने लग्न केले नाही असा - ब्रम्हचारी
 
➡ज्याचा कधीही वाट येत नाही - अवीट 
 
➡एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा - अष्टावधानी 
 
➡एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा - अनन्यभक्ती 
 
➡ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे - अव्दैत
 
➡आकाशातील तार्‍यांचा पट्टा - आकाशगंगा 
 
➡कुस्ती खेळण्याची जागा - आखाडा 
 
➡सूचना न देता येणारा पाहुणा - आगंतुक