║🍁 *देवणी टिचर्स ग्रुप* 🍁.║ ┖══════════════┚
*_📚दैनिक परिपाठ_*📚
दि.24/12 /2021
◥◣◢◤◥◣◢◤✴✴◥◣◢◤◥◣◢◤
*_✍ υвє∂ ѕнαιкн,*
*Α¢нωαℓα т۹-∂єσηι.*
*∂ιѕт-ℓαтυя_*✍
◥◣◢◤◥◣◢◤✴✴◥◣◢◤◥◣◢◤
*_👫👬राष्ट्रगीत👫👫_*
*◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*
*_👭👬प्रतिज्ञा👭👬_*
*◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*
*_👫👬संविधान👫👬_*
*◆━━━━━━◆❃◆━━━━━━◆*
*_🔰आजचा सुविचार_*🔰
*जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.*
*࿇ ══━━━━✥◈✥━━━━══ ࿇*
*_💦आजची म्हण💦_*
*चालत्या गाडीला खीळ*
*👉अर्थ*
🎤व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.
*═══════ ➖ ◖◍◗➖ ═══════*
*_💥आजचा दिनविशेष_*💥
*महत्त्वाच्या घटना:*
१९९९ : काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
१९७९ : सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
१९५१ : लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
१९४३ : दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
१९२४ : अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
१९१० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
१९०६ : रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
१७७७ : कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
*➡जन्मदिवस / जयंती / वाढदिवस*:
१९५९ : अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार
१९५७ : हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
१९२४ : मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)
१८९९ : पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)
१८८० : डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
१८६४ : विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
१८१८ : जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
११६६ : जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)
*➡मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:*
२००५ : भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)
१९८७ : एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)
१९७७ : नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)
वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी
१९७३ : पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
१५२४ : वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷♐♐⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*बोधकथा*
*सोन्याची अंडी देणारी कोंबडी*
👉एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.
एकदा त्याच्या मनात विचार येतो की, ‘कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील’ व आपण जर कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ. या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो खूप उदास होतो कारण कोंबडी मेल्यामुळे त्याला रोज मिळणारे सोन्याचे अंडे मिळणेही बंद झाले.
*तात्पर्य - जेवढे आपल्याला मिळते त्यातच समाधान मानावे, कोणत्याही गोष्टींची जास्त हाव करू नये.*
⫷⫸⫷⫸⫷⫸⫷♐♐⫸⫷⫸⫷⫸⫷⫸
*_📰आजच्या ठळक बातम्या_*📰
*═══════➡ ◖◍◗ ➡═══════*
*_🔱प्रश्नमंजुषा_🔱*
*📘शास्त्रीय उपकरणे व त्यांची नियमन कार्य*📘
*🔰उपकरणाचे नाव - कार्य*
*व्होल्टमापी* - विजेचा दाब
*प्रकाशमापी* - प्रकाशाची तीव्रता
*पर्जन्यमापी* - पर्जन्यमान
*ज्वरमापी* - शरीराचे तापमान
*स्टेथेस्कोप* - हृदयाचे ठोके मोजणे
*होकायंत्र* - उत्तर व इतर दिशा दाखविणे
*सुक्ष्ममापी* - सुक्ष्मअंतरे व कोन मोजणे
*वातकूक्कुट* - वार्याची दिशा
*विद्युत जनित्र* - विद्युत प्रवाहाची शक्ती
*वर्णमापी* - रंगाच्या तीव्रतेतील फरक
·*परिगणक* - गणिती आकडेवारी
·*श्रवणमापक* - श्रवणशक्तीतील फरक
·*दूरमुद्रक* - संदेश दूरवर पाठवणे, येणारे संदेश घेणे व मुद्रित करणे
·*गणकयंत्र* - प्रचंड गुंतागुंतीचे हिशोब व परिगणना क्षणार्धात सोडविणे
·*कॅलरीमापी* - उष्णतेचे प्रमाण
·*विस्थरीमापी* - द्रव्यपदार्थाचा चिकटपणा
·*किरण लेखन यंत्र* - सौर उत्सर्जन मोजणे व नोंदणे
·*सुक्ष्मदर्शक* - सुक्ष्म पदार्थ मोठे करून पाहणे
·*समतलमापी* - क्षितीज समांतर पातळी मोजणे
·*विद्युत भारमापी* - विद्युतभाराचे अस्तित्व
*वायुवेग मापक* - वार्याची दिशा आणि भार
·*दुग्धता मापी* - दुधांची सापेक्ष घनता
_▂ ▃ ▅ ▆ █ Thanks █ ▆ ▅ ▃ ▂_
*_फलक लेखणासाठी उपयुक्त_*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें