Only Education 123

Ubed Shaikh Deoni(Latur)

शनिवार, 30 मई 2026

सेवानिवृत्ती आभार संदेश (Ubed Shaikh) 31/05/2026

           सेवानिवृत्ती आभार संदेश

"माझ्या सेवाकाळात मला सहकार्य, मार्गदर्शन आणि पाठिंबा देणाऱ्या सर्व सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि मित्रांचे मनःपूर्वक आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे माझा व्यावसायिक प्रवास यशस्वी आणि आनंददायी झाला. आज सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावर उभा असताना अनेक सुंदर आठवणी आणि अनुभव सोबत घेऊन जात आहे. आपण दिलेले प्रेम, सन्मान आणि शुभेच्छा माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी राहतील. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद."

सोमवार, 9 मार्च 2026

गोपनिय अहवाल कोरा फॉम

मत्ता दायित्व कोरा फार्म व माहिती

_दिनांक ३१ मार्च च्या स्थितीस अनुसरून सर्व सरकारी कर्मचारी यांना मत्ता व दायित्व प्रपत्र आपण ज्या कार्यालयात कार्यरत आहोत त्या कार्यालयात जमा करायचे असतात.परंतु बरेच कर्मचारी हे प्रपत्र कार्यालयात जमा करत नाहीत त्यामुळे पदोन्नती किंवा आर्थिक श्रेणीवाढ कर्मचा-यांना देतांना अडचण निर्माण होऊ शकते.आज या पोस्ट च्या माध्यमातून मत्ता व दायित्व (Assets and Liability) प्रपत्र कसे भरावे ते आपण पाहणार आहोत.           
 _सर्व सरकारी कर्मचारी बंधू भगिनी मिळणाऱ्या वेतनातून चल किंवा अचल मालमत्ता विकत घेवू शकतो. यासाठी ते कर्ज काढू शकतात. त्यामुळे आपल्याला दरवर्षी 31 मार्च या तारखेला अनुसरून आपल्याला तीन प्रकारात माहिती सादर करावी लागते. यात चल प्रपत्र, अचल प्रपत्र, दायित्व प्रपत्र_ 

*1. चल मालमत्ता :-*
                  _तुमच्या कडे असलेली दागदागिने,रत्न,बँक खात्यातील रोकड,पोस्टातील bonds,पीपीएफ ची रक्कम ,तुमच्या कडे असलेली वाहने,mobile,घरातील सर्व महाग इलेक्ट्रोनिक्स वस्तूंचा सुद्धा समावेश ह्या मध्ये होत असतो._

*2. अचल मालमत्ता :-* 
                 _अचल मालमत्ता म्हणजे अशी संपत्ती जी हलवता येत नाही.ज्यात तुमचे घर,प्लॉट,flat किंवा दुकान ह्यांचा समावेश होत असतो.अचल मालमत्ता तुमच्या स्वताच्या मालकीची असो किंवा तुम्हाला वंशपरंपरेने मिळाली असेल किंवा कोणी भेट म्हणून दिली असेल त्या सर्व मालमत्तेचा उल्लेख आपल्याला अचल मालमत्ता प्रपत्र भरताना करावयाचा असतो._

*3. दायित्व :-* 
               _दायित्व म्हणजे आपल्याला कोणाचे किती कर्ज परत करायचे आहे किंवा कर्मचार्यांवर किती कर्ज आहे हे नमूद करावयाचे असते._