♦म्हणी भाग 21♦
♦सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - कोणत्याही गोष्टीची मर्यादा ठरलेली असतेच.
♦सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा - जवळच्या खूप व्यक्ती आहेत पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे.
♦साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे.
♦सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही - स्वाभिमानी माणसावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपले तत्व सोडत नाही.
♦सुंटी वाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष कमी होणे.
♦सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तु वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.
♦हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे परस्पर दुसर्याची वस्तू तिसर्याला देणे.
♦हसतील त्याचे दात दिसतील - चांगले काम करताना टिंगल करणार्यांची पर्वा न करणे.
♦हपापाचा माल गपापा - कोणाचे फुकट घेतलेले तसेच जाणे.
♦हत्ती गेला नि शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडासा भाग शिल्लक राहिला.
♦हत्तीच्या पायी येते अन मुंगीच्या पायी जाते - कोणतीही गोष्ट येताना ती खूप लवकर येते पण जाताना मात्र हळूहळू जाते.
♦हाजीर तो वजीर - जो वेळेवर उपस्थित असतो त्याचाच फयदा होतो.
♦हातच्या काकणांला आरसा कशाला? - स्पष्ट असणार्या गोष्टीला पुरावा कशाला?
♦हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे (वसे) - दिर्घोद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते.
♦ह्या हातचे त्या हातावर - वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
♦हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.