*✲✪✪༻🅜 🅢 🅟༺✲✪✪༻*
⏺️महाराष्ट्र शिक्षक पॅनल⏺️
┎═══════════┒
▌ ✺स्पर्धा परीक्षा✺ ▌
┗═══════════┛
📘म्हणी व अर्थ📘2️⃣
⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑
➊आचार भ्रष्टी सदा कष्टी
👉- ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
➋आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
👉- अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
➌आईचा काळ बायकोचा मवाळ
👉 - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
➍आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
👉 - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
➎आपलेच दात आपलेच ओठ
👉- आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
➏अंथरूण पाहून पाय पसरावे
👉- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
➐आवळा देऊन कोहळा काढणे
👉- क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
➑आलीया भोगाशी असावे सादर
👉- कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
➒अचाट खाणे मसणात जाणे
👉- खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
➓आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
👉- अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
➊➊आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
👉- ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
➊➋आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं
👉 - स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
➊➌अळी मिळी गुप चिळी
- रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
➊➍अहो रूपम अहो ध्वनी
- एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*पोस्ट क्रमांक:-7️⃣1️⃣3️⃣*
संकलन-
*✍️𝓤 𝓫 𝓮 𝓭 𝓢 𝓱 𝓪 𝓲 𝓴 𝓱*
*𝓓 𝓮 𝓸 𝓷 𝓲 (𝓛 𝓪 𝓽 𝓾 𝓻 )* ✍️
*✲✪✪༻🅜 🅢 🅟 ༺✲✪✪༻*
*▂ ▃ ▄ महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ▅ ▄ ▃