🏉म्हणी भाग 11🏉
दुरून डोंगर साजरे - दुरून चांगल्या दिसणार्या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते.
दुसर्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही - दुसर्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो. पण स्वत:च्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही.
दुष्काळात तेरावा महिना - अगोदरच्या संकटात आणखी भर
देव तारी त्याला कोण मारी - देव ज्यांचा पाठीराखा आहे त्यांचे नुकसान कोणीही करू शकणार नाही.
देश तसा वेश - जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वर्तन करणे.
दैव देते पण कर्म नेते - नशिबामुळे प्रगती होते पण स्वत:च्या चुकीमुळे र्हास होणे.
दैव उपाशी राही उद्योग पोटभर खाई - नशिबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ
देह देवळात चित्त (पायतानात) खेटरात - आध्यात्मिक कार्यात शरीराने सहभागी झाले, तरी मन मात्र ऐहिक संसारात गुंतलेले असणे.
दुनिका झुकती हैl झुकानेवाला चाहिएl - लोकांना मूर्ख बनविणारा एखादा ठकसेन असला तर फसणारे अनेकजण या जगात आहेत.
धर्म करता, कर्म उभे राहते - एखादी चांगली गोष्ट करायला गेले तर त्यातून नको ती समस्या उभी राहते.
धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.
न कर्त्याचा वार शनिवार - न करायचे काम कारण सांगूण टाळून टाकणे.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न - दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.
नखाने काम होते त्याला कुर्हाड कशाला - काम अल्पशा धनाने, कष्टाने होते तेव्हा तेथे मोठी शक्ती किंवा श्रम कशाला लावायचे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें