🩸म्हणी भाग 20🩸
🩸वेळ ना वारी गाढव आले दारी - मूर्खाला योग्य अयोग्य प्रसगाचे भान नसते.
🩸वाघ म्हटले तरी खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच - एखाद्या बरोबर आपण कितीही चांगले वागा पण तो आपला स्वभाव सोडणारच नाही, त्याचा गुण दाखवणारच.
🩸शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यावर तो ऐकतो.
🩸शेरास सव्वाशेर - एखाद्याचा गर्व कमी करण्यासाठी वरचढ माणूस भेटणे.
🩸शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते.
🩸शेंडी तुतो वा पारंबी तुटो - पक्का निश्चय करणे.
🩸शिंक्याचे तुटले नि बोक्याचे फावले - एकाचा तोटा तोच दुसर्याचा फायदा होत असतो.
🩸शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी? - आपल्यासाठी अतोनात परिश्रम करताना त्रास सहन केला तरी त्याचा विचार न करता कामातील चुका शोधून काढणे.
🩸सगळे मुसळ केरात - मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यावर घेतलेले सर्व कष्ट वाया जातात.
🩸सत्तेपुढे शहाणपण नाही - अधिकार शक्ती असलेल्या माणसापुढे कुणाचेच काही चालत नाही.
🩸साठी बुद्धी नाठी - म्हातारपण आले की बुद्धी चळते विवेकशक्ती कमी होते.
🩸स्वार्थी आले अन शास्त्री गेले - स्वार्थापोटी विव्दता गेली.
🩸साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवानाला कशाचीही कमतरता पडत नाही
🩸सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी - न होणार्या कामाची तयारी प्रारंभापासून करणे.
🩸सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही - जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें