💎बाप तसा बेटा - मुलाच्या अंगी वडिलांचे गुणधर्म व कुटुंबाचे संस्कार येतात.
💎बापाला बाप म्हणेना चुलत्याला काका कसा म्हणेल - जवळच्याचा मान न ठेवणारा इतरांचा मान काय ठेवील.
💎बाप दाखव नाही तर श्राद्ध कर - एखाद्याला आपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करण्यास सांगणे किंवा आपले म्हणणे चुकीचे असल्याचे मान्य करणे.
💎बडा घर पोकळ वासा - दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात संपत्तीचा अभाव.
💎बापसे बेटा सवाई - वडीलापेक्षा मुलगा अधिक कर्तबगार.
💎बावळी मुद्रा देवळी निद्रा - दिसण्यात बावळट पण व्यवहारचतुर माणूस
💎बुडत्याला काडीचा आधार - घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत ही महत्वाची वाटते.
💎बुडत्याचा पाय खोलात - ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो, त्याला सतत अपयशच येत जाते.
💎बैल गेला अन झोपा केला - एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.
💎बोलेल तो करेल काय - केवळ बडबड करणार्याकडून काहीही होऊ शकत नाही.
💎बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले - बोलण्याप्रमाणे कृती करणार्या माणसाला सन्मानाने वागवावे.
💎बाजारात तुरी अन भट भटणीला मारी - उगीचच कल्पनेचा आधाराने भांडण करणे.
💎बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी - बोलून सगळ्यांना आश्चर्यचकित करावयाचे पण खर काहीच नाही.