Ubed Shaikh Deoni(Latur)

रविवार, 24 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा चाचणी क्र. 1

https://quizzory.in/id/617501fa74bd913872051b56
👉वरील निळ्या अक्षरावर टच करा व सोडवा चाचणी 
     *📔महाराष्ट्र शिक्षक पॅनल*📔
            सोडवा:-10 प्रश्न 10 गुण

सामान्य ज्ञानावर आधारित चाचणी असून आपल्या पाल्याचे सामान्य ज्ञान तपासा
➖➖➖➖➖➖➖➖➖
       *महाराष्ट्र शिक्षक पॅनल*

शनिवार, 23 अक्टूबर 2021

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)

                      🏵 जिल्हे निर्मिती🏵


🌈 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

🌈                   औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

🌈 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

🌈    26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

🌈 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

🌈 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

🌈                     अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

🌈 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

  🌈                   भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)

🌈.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

स्पर्धा परीक्षा (सामान्य माहिती)



♦मराठवाडा विभागाचे मुख्यालय कोठे आहे? 
              👉- औरंगाबाद. 

♦· लातूर जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? -
              👉 उस्मानाबाद. 

♦· जालना पूर्वी कोणत्या जिल्ह्यात होता? 
              👉- औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील कोणत्या विभागात जंगले सर्वात कमी आहेत? -
              👉   मराठवाडा. 

♦· गवताळा औटरामघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉 औरंगाबाद-जळगाव. 

♦· जायकवाडी उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉औरंगाबाद. 

♦· हिमायतबाग उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? -
              👉  औरंगाबाद. 

♦· विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
              👉- नांदेड. 

♦· गोदावरी नदीवरील जायकवाडी प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? -
              👉 पैठण-औरंगाबाद. 

♦· जायकवाडी जलाशयाचे नाव काय? 
              👉 - नाथसागर. 

♦· बोरांसाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? -
              👉 राहुरी व औरंगाबाद. 

♦· महाराष्ट्रातील ज्वारीचे उत्पादन कोणत्या भागात जास्त होते? 
              👉 - मराठवाडा. 

रविवार, 30 मई 2021

♦स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -21♦


♦म्हणी भाग 21♦

♦सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - कोणत्याही गोष्टीची मर्यादा ठरलेली असतेच. 
 
♦सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा - जवळच्या खूप व्यक्ती आहेत पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. 
 
♦साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे.
 
♦सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही - स्वाभिमानी माणसावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपले तत्व सोडत नाही. 
 
♦सुंटी वाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष कमी होणे.  
 
♦सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तु वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.
 
♦हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे परस्पर दुसर्‍याची वस्तू तिसर्‍याला देणे.
 
♦हसतील त्याचे दात दिसतील - चांगले काम करताना टिंगल करणार्‍यांची पर्वा न करणे.
 
♦हपापाचा माल गपापा - कोणाचे फुकट घेतलेले तसेच जाणे. 
 
♦हत्ती गेला नि शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडासा भाग शिल्लक राहिला. 
 
♦हत्तीच्या पायी येते अन मुंगीच्या पायी जाते - कोणतीही गोष्ट येताना ती खूप लवकर येते पण जाताना मात्र हळूहळू जाते. 
 
♦हाजीर तो वजीर - जो वेळेवर उपस्थित असतो त्याचाच फयदा होतो. 
 
♦हातच्या काकणांला आरसा कशाला? - स्पष्ट असणार्‍या गोष्टीला पुरावा कशाला? 
 
♦हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे (वसे) - दिर्घोद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. 
 
♦ह्या हातचे त्या हातावर - वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
 
♦हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
 

 

 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -20


🩸म्हणी भाग 20🩸

🩸वेळ ना वारी गाढव आले दारी - मूर्खाला योग्य अयोग्य प्रसगाचे भान नसते. 
 
🩸वाघ म्हटले तरी खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच - एखाद्या बरोबर आपण कितीही चांगले वागा पण तो आपला स्वभाव सोडणारच नाही, त्याचा गुण दाखवणारच.
 
🩸शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यावर तो ऐकतो.
 
🩸शेरास सव्वाशेर - एखाद्याचा गर्व कमी करण्यासाठी वरचढ माणूस भेटणे. 
 
🩸शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते.
 
🩸शेंडी तुतो वा पारंबी तुटो - पक्का निश्चय करणे. 
 
🩸शिंक्याचे तुटले नि बोक्याचे फावले - एकाचा तोटा तोच दुसर्‍याचा फायदा होत असतो. 
 
🩸शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी? - आपल्यासाठी अतोनात परिश्रम करताना त्रास सहन केला तरी त्याचा विचार न करता कामातील चुका शोधून काढणे. 
 
🩸सगळे मुसळ केरात - मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यावर घेतलेले सर्व कष्ट वाया जातात. 
 
🩸सत्तेपुढे शहाणपण नाही - अधिकार शक्ती असलेल्या माणसापुढे कुणाचेच काही चालत नाही.
 
🩸साठी बुद्धी नाठी - म्हातारपण आले की बुद्धी चळते विवेकशक्ती कमी होते. 
 
🩸स्वार्थी आले अन शास्त्री गेले - स्वार्थापोटी विव्दता गेली.
 
🩸साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवानाला कशाचीही कमतरता पडत नाही
 
🩸सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी - न होणार्‍या कामाची तयारी प्रारंभापासून करणे. 
 
🩸सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही - जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते