💡म्हणी भाग 14💡
💡पिंडी ते ब्रम्हांडी - एका छोट्या वस्तुत जे आहे तेच मोठ्या वस्तुत आहे.
💡पी हळद अन हो गोरी - कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.
💡पुढे तिखट मागे पोचट - दिसते तसे नसते.
💡पेरले ते उगवते - चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते.
💡पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा - थोड्या मोबदल्यात जास्त काम करून घेणे.
💡पिकते तेथे विकत नाही - निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते.
💡फार (अति) झाले हसू आले - एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा चघळली तर तिचे महत्व कमी होते.
💡फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय - शासनाचा निर्णय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असलातरी तो मान्य करावाच लागतो.
💡फुल ना फुलाची पाकळी - वास्तविक जितके द्यायला पाहिजे, तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा खूपच कमी देणे.
💡फुले वेचली तेथे गोवर्या वेचणे - जेथे ऐश्वर्याचा उपभाग घेतला तेथे वाईट परिस्थिती येणे.
💡फुटका डोळा काजळाने साजरा करावा - स्वत:चा दोष नाहीसा करता येत नसल्यास तो कमी करण्याचा प्रयत्न करावा.
💡बळी तो कान पिळी - शक्तिमान माणूस दुसर्यावर अधिकार गाजवतो.