📀म्हणी भाग 13📀
📀निंदकाचे घर असावे शेजारी - निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्याच्यामुळे आपले दोष आपल्याला कळतात.
📀पळसाला पाने तीनच - सगळीकडे परिस्थिती एक सारखीच असणे.
📀पर दु:ख शीतळ - दुसर्याच्या दु:खाची खरी कल्पना येत नाही.
📀पदरी पडले खोड हसून करावे गोड - स्वीकारलेल्या गोष्टीला नाव न ठेवता हसून समाधान माणने
📀पडत्या फळाची आज्ञा - आपल्या समोरील प्रसंग शिरसावंद्य माणून काम करणे.
📀पाचमुखी परमेश्वर - बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे.
📀पाचही बोटे सारखी नसतात - सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात.
📀प्रयत्नांती परमेश्वर - कितीही कठीण गोष्ट असली तरी अथक प्रयत्नानंतर ती साध्य होते म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवावे.
📀पालथ्या घड्यावर पाणी - एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे.
📀पाप्याला पंढरपूर आळशेल्याला गंगादूर - श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही.
📀पाय धू तर म्हणे तोंड केवढ्याचे - सांगितलेले काम सोडून नको त्या गोष्टी करणे.
📀प्राणावर आले होते:पण शेपटावर निभावले - जिवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचने.
📀पायाची वहाण पायीच बरी - एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक महत्व देऊ नये.
📀पळणार्याला एक वाट तर शोधणार्याल बारा वाटा - लबाडी करणे फार सोपे पण ती शोधून काढणे खूप कठीण असते.
📀पडलेले शेण माती घेऊन उठते - चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे कितीही जारी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.