Ubed Shaikh Deoni(Latur)

मंगलवार, 25 मई 2021

⭕स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -11⭕


🏉म्हणी भाग 11🏉

दुरून डोंगर साजरे - दुरून चांगल्या दिसणार्‍या गोष्टीचे खरे स्वरूप जवळून समजते. 
 
दुसर्‍याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही - दुसर्‍याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो. पण स्वत:च्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. 
 
दुष्काळात तेरावा महिना - अगोदरच्या संकटात आणखी भर 
 
देव तारी त्याला कोण मारी - देव ज्यांचा पाठीराखा आहे त्यांचे नुकसान कोणीही करू शकणार नाही.
 
 
देश तसा वेश - जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे वर्तन करणे. 
 
दैव देते पण कर्म नेते - नशिबामुळे प्रगती होते पण स्वत:च्या चुकीमुळे र्हास होणे.
 
दैव उपाशी राही उद्योग पोटभर खाई - नशिबापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ 
 
देह देवळात चित्त (पायतानात) खेटरात - आध्यात्मिक कार्यात शरीराने सहभागी झाले, तरी मन मात्र ऐहिक संसारात गुंतलेले असणे. 
 
दुनिका झुकती हैl झुकानेवाला चाहिएl - लोकांना मूर्ख बनविणारा एखादा ठकसेन असला तर फसणारे अनेकजण या जगात आहेत. 
 
धर्म करता, कर्म उभे राहते - एखादी चांगली गोष्ट करायला गेले तर त्यातून नको ती समस्या उभी राहते.
 
धरलं तर चावतय, सोडलं तर पळतय - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. 
 
न कर्त्याचा वार शनिवार - न करायचे काम कारण सांगूण टाळून टाकणे.
 
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न - दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात.
 
नखाने काम होते त्याला कुर्‍हाड कशाला - काम अल्पशा धनाने, कष्टाने होते तेव्हा तेथे मोठी शक्ती किंवा श्रम कशाला लावायचे.
 

 

 

🎛स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -10🎛


🎛म्हणी भाग 10🎛

🎛तहान लागल्यावर विहीर खोदणे - जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज वाटली तेव्हा ती मिळवण्याची तयारी करणे. 
 
🎛थांबला तो संपला - जो कोणताही कामधंदा करत नाही त्याची अधोगतीच होते. 
 
🎛थेंब थेंब तळे साचे - हळूहळू वस्तूचा संग्रह केला तर कालतंराने वस्तुंचा मोठा साठा (संचय) होतो. 
 
🎛थोरा घरचे श्वान त्याला सर्वही देती मान - मोठ्या माणसाचा आश्रय घेणार्‍याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. 
 
🎛दाम करी काम - पैशाने सर्व कामे साध्य होतात. 
 
🎛दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते. 
 
🎛दही खाऊकी मही खाऊ - हे करू कि ते करू अशी व्दिधा परिस्थिती 
 
🎛दस कि लकडी एक का बोझा - प्रत्येकाने थोडाफार हातभार लावल्यास सर्वाच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. 
 
🎛दृष्टी आड सृष्टी - आपल्यामागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. 
 
🎛दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत - एखादी गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. 
 
🎛दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसात देखील दोष असतो. 
 
🎛दिवस बुडाला, मजूर उडाला - विशिष्ट वेळेतच काम करणे.
 
🎛दिल्ली तो बहुत दूर है - झालेल्या कामाच्या मानानेखूप साध्य करावयाचे बाकी असणे. 
 
🎛दिल चंगा तो कथौडी में गंगा - आपले अंत:करण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याच जवळ असते.
 

 

 

🩸स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -9🩸


🔮म्हणी भाग 9🔮

🔮जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही - मूळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.
 
🔮जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी - मातेकडून बालकावर सुसंस्कार होतात म्हणून ते भविष्यात कर्तुत्ववान ठरते.
 
🔮झाकली मूठ सव्वा लाखाची - व्यंग गुप्त ठेवणेच फायद्याचे असते. 
 
🔮टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही. 
 
🔮टिटवी देखील समुद्र आटविते - सामान्य क्षुद्र वाटणारा माणूस प्रसंगी महान कार्य करू शकतो. 
 
🔮डोळ्यात केर आणि कानात फुंकर - रोग एक आणि उपचार दुसराच.
 
🔮डोंगर पोखरून उंदीर काढणे - प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे. 
 
🔮तंटा मिटवायला गेला गव्हाची कणिक करून आला - भांडण मिटविण्याऐवजी भडकावणे. 
 
🔮तळे राखील तो पाणी चाखील - आपल्याकडे सोपविलेल्या कामाचा थोडाफार लाभ मिळविण्याची प्रत्येकाची प्रवृत्ती असते. 
 
🔮ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला - वाईट माणसाच्या सहवासामध्ये चांगला माणूसही बिघडतो. 
 
🔮ताकापुरते रामायण - आपले काम होईपर्यंत एखाद्याची खुशामत करणे
 
🔮तोंड दाबून बुक्यांचा मार - एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्गही बंद करणे. 
 
🔮तेल गेले तूप गेले आणि हाती धुपाटणे राहिले - फायद्याच्या दोन गोष्टीमधून मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.
 

 

🧿स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -8🧿


🧿म्हणी भाग 8🧿

🧿चोराच्या उलटया बोंबा - स्वत:च गुन्हा करून दुसर्‍यावर आळ घेणे.
 
🧿चोराच्या मनात चांदणे - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. 
 
🧿चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्‍यावर कडी करणे.
 
🧿जळत्या घराचा पोळता वासा - प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे. 
 
🧿जलात राहुन माशांशी वैर करू नये - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये. 
 
🧿जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला - निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते. 
 
🧿जळत घर भाड्याने कोण घेणार - नुकसान करणार्‍या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. 
 
🧿जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसर्‍याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते. 
 
🧿ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकमेंकाचे वर्म माहीत असणार्‍या माणसांशी गाठ पडणे.
 
🧿ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट - जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
 
🧿जशी देणावळ तशी धुणावळ - मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. 
 
🧿ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो. 
 
🧿जी खोड बाळ ती जन्मकळा - लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात. 
 
🧿ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार
 

 

 

🦋स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -7🦋


📼म्हणी भाग 7📼

📼गोगलगाय नि पोटात पाय - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. 
 
📼गोरागोमटा कपाळ करंटा - दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती. 
 
📼घर ना दार देवळी बिर्‍हाड - बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती. 
 
📼घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात. 
 
📼घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्‍यांने आपलेही काम लादणे. 
 
📼घर पहावे बांधून लग्न पहावे करून - अनुभवाने माणूस शहाणा होतो. 
 
📼घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते - आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात. 
 
📼घरोघरी मातीच्याच चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे. 
 
📼घोडे खाई भाडे - धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त. 
 
📼चढेल तो पडेल - गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही. 
 
📼चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थीत चालणार्‍या कार्यात अडचण निर्माण होणे. 
 
📼चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही - लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत. 
 
📼चिंती परा येई घरा - दुसर्‍याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते. 
 
📼चोर सोडून सान्याशाला फाशी - खर्‍या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्‍याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.
 

 

🌄स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -6🌄


🌄म्हणी भाग 6   🌄 

🌄खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट कृत्य करणार्‍याला माणसाचे शेवटी वाईटच होते. 
 
🌄गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
 
🌄गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच. 
 
🌄गरज सरो नि वैद्य मरो - आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे. 
 
🌄गर्जेल तो पडेल काय - केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते. 
 
🌄गाढवाला गुळाची चव काय - मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
 
🌄गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.
 
🌄गाव करी ते राव ना करी - श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात. 
 
🌄गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो. 
 
🌄गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता - मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो. 
 
🌄गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे. 
 
🌄गाढवाच्या पाठीवर गोणी - एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा. 
 
🌄गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे. 
 
🌄गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य - ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.
 

 

 

 

🎯स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -5🎯


📗म्हणी भाग 5📗

📗कावळा बसायला अन फांदी तुटायला - परस्परांशी कारण-संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाचवेळी घडणे.
 
📗कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच - कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळस्वभाव बदलत नाही. 
 
📗कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणीकडे - रखवालादारानेच विश्वासघात करून चोरी करणे.
 
📗कोल्हा काकडीला राजी - क्ष्रुद्र माणसे क्षुद्र गोष्टीनीही खुश होतात.
 
📗कोरड्याबरोबर ओले ही जळते - निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे.
 
📗कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही - निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. 
 
📗काखेत कळसा नि गावाला वळसा - हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.
 
📗कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही - क्षुद्र माणसांनी केलेल्या दोषा रोपाने थोरांचे नुकसान होत नसते.
 
📗खाण तशी माती - आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.
 
📗खर्‍याला मरण नाही - खरे कधी लपत नाही, सत्य मेव जयते!
 
📗खाऊ जाणे ते पचवू जाणे - एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो.
 
📗खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - परिस्थितीशी जुळवून न घेता हट्टीपणाने वागणारा. 
 
📗खाऊन माजवे टाकून माजू नये - पैशाच्या संपतीचा गैरवापर करू नये.