*✲✪✪༻🅜 🅢 🅟༺✲✪✪༻*
⏺️महाराष्ट्र शिक्षक पॅनल⏺️
┎═══════════┒
▌ ✺स्पर्धा परीक्षा✺ ▌
┗═══════════┛
📘म्हणी व अर्थ📘2️⃣
⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑
➊आचार भ्रष्टी सदा कष्टी
👉- ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो.
➋आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
👉- अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती.
➌आईचा काळ बायकोचा मवाळ
👉 - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
➍आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
👉 - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे.
➎आपलेच दात आपलेच ओठ
👉- आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे.
➏अंथरूण पाहून पाय पसरावे
👉- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा.
➐आवळा देऊन कोहळा काढणे
👉- क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे.
➑आलीया भोगाशी असावे सादर
👉- कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
➒अचाट खाणे मसणात जाणे
👉- खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
➓आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
👉- अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
➊➊आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
👉- ज्या दोषाबद्दल आपण दुसर्याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे.
➊➋आपला तो बाब्या दुसर्याचं ते कारटं
👉 - स्वत:चे चांगले आणि दुसर्यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे.
➊➌अळी मिळी गुप चिळी
- रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे.
➊➍अहो रूपम अहो ध्वनी
- एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*पोस्ट क्रमांक:-7️⃣1️⃣3️⃣*
संकलन-
*✍️𝓤 𝓫 𝓮 𝓭 𝓢 𝓱 𝓪 𝓲 𝓴 𝓱*
*𝓓 𝓮 𝓸 𝓷 𝓲 (𝓛 𝓪 𝓽 𝓾 𝓻 )* ✍️
*✲✪✪༻🅜 🅢 🅟 ༺✲✪✪༻*
*▂ ▃ ▄ महाराष्ट्र शिक्षक पॅनल* ▅ ▄ ▃
इस टिप्पणी को एक ब्लॉग व्यवस्थापक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएंखुप छान सर , आपला ब्लॉग वर खुप महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
जवाब देंहटाएंविद्यार्थ्यांना अधिक सरावासाठी विविध विषयांच्या टेस्ट www.abhyaskatta.com
वर दिलेल्या आहेत. त्या टेस्ट आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकता.
Dipak
जवाब देंहटाएंChetan pagar
हटाएं