Ubed Shaikh Deoni(Latur)

शुक्रवार, 7 अक्टूबर 2022

चिमणी

*अध्ययन निश्चिती सराव करण्यासाठी उतारा वाचन*
क्रं. -3
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

अंगणात विटीदांडू किंवा गोट्यांचा खेळ मांडला जायचा. तेंव्हा मी मात्र बसल्या जागी भिंतीच्या कपारीत घरटं करणार्या चिमण्यांना न्याहाळत असायचो. चिमणा अन चिमणी आळीपाळीने कापूस, दो-या अन वरचेवर उडणारी पिसं धरून खोप्यात भरायची. चिमणी स्वस्थ चित्तानं बसलेली कधी दिसायची नाही. 
उभा पाऊस अंगावर झेलून एके दिवशी चिमणा समोरच्या तारेवर चोच घासत होता. तेंव्हाच चिमणीची मात्र खोपा बांधण्याची धांदल चालली होती. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥प्रश्न आमचे उत्तर तुमचे💥

1) अंगणात कोणता खेळ मांडला जायचा? 
2)" चित्त" समानार्थी शब्द लिहा? 
3) न्याहाळणे म्हणजे काय? 
4) चिमणीच्या घराला काय म्हणतात? 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्मिती:-
υвє∂ ѕнαιкн ∂éσηι, (ℓαтυя

गुरुवार, 6 अक्टूबर 2022

मिलीचा फुगा

 अध्ययन स्तर निश्चिती वाचन लेखन सराव करण्यासाठी उतारा वाचन भाग ➋
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एके दिवशी मिलीच्या पप्पांनी फुगा आणला. 
मिलीने फुगा हवेत उडविला. 
फुग्यात हवा हळूहळू निघू लागली. 
लहान होत होत फुगा छताला धडकला. 
फुगा चपटा होऊन खाली पडला. 
मिलीने फुगा पुन्हा फुगविला. 
मिलीने फुगा पुन्हा हवेत उडविला. 
फुगा सूं.. सूं.. आवाज करू लागला. 
मिली फुग्याच्या आवाजाने खूप खूश झाली. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न आमचे उत्तर तुमचे

➊मिलीच्या पप्पांनी मिलीला काय आणून दिले? 
➋मिलीने हवेत काय उडविला?
➌ छत म्हणजे काय? 
➍फुग्यातून आवाज कसा येत होता? 
➎मिली खूश का झाली? 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्मिती:-
υвε∂ sнαιкн
Deoni (Latur) 

भारी कोण?

   अध्ययन स्तर निश्चिती  सराव करण्यासाठी उतारा वाचन व लेखन  (भाग-1) 
___________________________________________
                          भारी कोण? 
    एके दिवशी सकाळी जंगलात सगळे प्राणी गोळा झाले. 
तिथे एक मोठा ओंडका पडलेला होता. 
त्याच्यावर एक छोटा ओंडका पडला होता. 
खेळता खेळता एक कुत्रा त्याच्यावर बसला. 
कुत्रा बसल्यामुळे त्याचे एक टोक जमिनीवर टेकले आणि दुसरे टोक वर आले. मग काय कुत्रा आनंदाने ओरडला, 
"कोण कोण माझ्याबरोबर खेळणार? "
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्न आमचे उत्तर तुमचे
1) जंगलात कोण गोळा झाले होते? 
2) खेळता खेळता कुत्रा कशावर बसला? 
3) ओंडका म्हणजे काय? 
4) जंगलातील प्राण्यांची नावे सांगा? 
ओंडक्याचे एक टोक जमिनीवर का टेकले होते? 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
निर्मिती:-υвε∂ sнαιкн
            Deoni(Latur) 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शनिवार, 20 अगस्त 2022

इयत्ता 1ली 1 ते 99 अंक कसे शिकवावे?

१ ली

*10 ते 99 अंक कसे शिकवावे*
                           

1लीच्या वर्गशिक्षका कडे फार मोठा *संयम* असला पाहिजे कारण
*पेरलं की लगेच उगवत नसतं*
त्याला खत पाणी (कृती,पद्धत, साहित्य व उपक्रम) लागतेच.

आपल्या वर्गातील विद्यार्थी 3 प्रकारची असतात..

*1)ऐकुन शिकणारी*
*2)पाहून शिकणारी*
*3)कृतीतून शिकणारे*
 हे सुरुवातीला समजून घ्या.

*आता शिकवावे कसे*

◆सुरुवातीला कृतीतूनच सर्वांना शिकवायचं

◆ मुलांचे 1ते9 अंक ओळख झाली आहे का ते तपासून घ्या

◆आत आपल्याला दशक संकल्पना शिकवायचं आहे.

◆विद्यार्थ्यांना दशक कसा तयार होतो हे काड्या, खडे, मणी गोट्या, विविध बी, गजगे, झाकण इ,,, साहित्याच्या साह्याने तुम्ही स्वतः करून दाखवा व दशक करत असताना असे म्हणत रहा "दशक म्हणजे दहा" दशक म्हणजे दहा...

◆म्हणजे मुले समजून जातील की दशक म्हणजे दहा

◆आता त्यांना वरील साहित्य हाताळायला द्या व दशक बनवायला लावा मुले नक्की दशक बनवून दाखवतीलच (हा माझा अनुभव) दशक संकल्पना विद्यार्थ्यांची आता पक्की झाली कारण त्यांना कळले दशक म्हणजे दहा बनवताही येत व ओळखता ही येते.

( *मात्र शाळेत वरील साहित्य* *असलेच पाहिजे कारण आपण कृतीतून शिकवतोय*)

◆आता खरी पद्धत सुरू◆

◆3 दिवस एक ओळ शिकवायची
उदा:- 11ते20ओळ, 21ते30ओळ, 31ते40ओळ
......91ते99ओळ

*म्हणजे 3दिवस × 9ओळी =27 दिवस* लागतील
(आपले 50 का लागेना)

मग 3 दिवस कोणते 

◆पहिला दिवस कृतीतून साहित्य हाताळून शिकवावे
◆दुसरा दिवस साहित्य पाहून शिकवावे
◆तिसरा दिवस ऐकून शिकवावे

◆पहिला दिवस पाहू◆
*कृतीतून शिकवावे*

◆आता आपण पहिली ओळ म्हणजे 11ते20 कशी शिकवायची पाहू

◆सुरुवातीला दशकाचे 10 गठ्ठे बनवून घ्या एका खाली एक असे 10 बनवा.

◆आता एक सुट्टी वस्तू घ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक एक अकरा

◆आता 2 वस्तू घ्या दुसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक दोन बारा..

◆आता 3वस्तू घ्या तिसऱ्या दशकाच्या गटात टाका व म्हणा एक दशक 3 तेरा

◆आशा प्रकारे सुट्या दहा वस्तू दहा दशकाच्या गटात ओळीने टाका व म्हणत रहा...

 ◆शेवटी दहाव्या दशकाच्या गटात दहा वस्तू टाकताना सांगा 
या दहा वस्तू व या दहा वस्तू म्हणजेच एक दशक व एक दशक मिळून 2 दशक होतात आणि त्याला म्हणायचं 2 दशक वीस...

◆आशा प्रकारे पहिल्या दिवसात प्रत्येक मुलाला हीच कृती करायला लावावी..

◆यामुळे प्रत्येक संख्या कशी तयार झाली हे मुलांना कळेल व संख्याच *संख्यापण* ही कळेल

◆आशा प्रकारे पहिला दिवस शिकवावा

◆आता दुसरा दिवस◆
*पाहून शिकवावे*

◆ सुरुवातीला थोडा वेळ पहिल्या दिवसाच्या कृती घ्या

◆आता फक्त आपणच दशक गट बनवायचे व वस्तू टाकायच्या आणि त्या मुलांनी ओळखायचा व सांगायच्या.

◆ही कृती करताना विद्यार्थ्यांना सर्व वस्तू नीट दिसाव्यात, टाकलेले समजावे यासाठी आपली गती सावकाश हवी

◆ आशा प्रकारे प्रत्येक 11ते20 अंकाचा प्रत्येक मुलाचा पाहून ओळखण्याचा सराव घ्यावा

◆दिवस तिसरा◆
*ऐकून शिकवणे*

◆सुरुवातीला मागील 2दिवसांचा थोडक्यात सराव घ्या

◆यात आपण स्पष्ट उच्चार करून संख्या उच्चारावी जसे की
एक दशक एक अकरा 
एक दशक दोन बारा
एक दशक आठ अठरा...
यापद्धतीने 11ते 20 अंकाचे उच्चार करावे मुले अचूक संख्या ओळखतील व लेखन करतील

*11 ते 20 या ओळीसाठी आपण 3दिवस दिले आहेत यात आपण विविध उपक्रम वापरून प्रत्येक दिवस भारी करू शकतो*

◆अशा पध्दतीने *सर्व* अंक शिकवावे

◆ *यात पद्धतीत शिक्षकाने घाई करू नये 1 ओळ शिकवण्यासाठी 3 दिवस ऐवजी 4/5 दिवस लागुदया पण विद्यार्थ्यांना संख्या कशी तयार झाली हे कळूद्या*

◆संख्या दृढीकरणासाठी
11 22 33 44 55..
12 32 43 52..
26 36 46 56...
28 38 48 58...
असे संख्याचे गट करून वाचन घेऊ शकतो.

परंतु
◆19 29 39 49 ...99 आशा संख्या शिकवताना आपल्याला खूप सराव घ्या लागतो या साठी 

*पद्धत 1--*
एका खाली एक
 फळ्यावर अशा पद्धतीने लिहून ठेवा फक्त एवढ्याच 👇
19 29 39 49 59 69 79 89 
20 30 40 50 60 70 80 90

या पद्धतीने वाचन सराव घ्या
एकोणतीस तीस
एकोणचाळीस चाळीस
एकोणसत्तर सत्तर
*भरपूर सराव घ्या* पाहून नंतर नंतर मुलांच्या लक्षात राहते.

*पद्धत 2री --*
1 उना वीस म्हणजे एकोणविस
1 उना तीस म्हणजे एकोनतीस
1उना ऐंशी म्हणजे एकोनऐंशी


*पद्धत 3री--*
मुलांना सांगा 
दोन दशक च्या गठ्ठयात आपण 9 टाकले आहेत मग दोन दशक नऊ एकोणतीस असे म्हणून घेऊ शकतो.

◆आशा पध्दतीने आपण घेऊ शकतो बऱ्याच शिक्षकांची वेगळी पद्धत असू शकते..

◆एक पध्दतीने शिकवून विद्यार्थ्यांना नाही समजलं तर शिक्षकाकडे वेगवेगळ्या पद्धती असायला पाहिजे.

◆ नुसते *पुस्तकाच्या पद्धती* शिकवलेलं सर्वच विद्यार्थ्यांना समजेल असे नाही. कारण *पुस्तक हे साधन आहे साध्य नाही*
कसं ही शिकवा पण शेवटचा विद्यार्थी शिकला पाहिजे...

◆प्रत्येक विद्यार्थ्याचा समजून घेण्याचा स्तर हा वेगवेगळा असतो विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने समजेल तीच पद्धत वापरली पाहिजे...
*सर्वच विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने नाही समजणार*
🙏
Ubed Shaikh Deoni(Latur)