Ubed Shaikh Deoni(Latur)

रविवार, 30 मई 2021

♦स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -21♦


♦म्हणी भाग 21♦

♦सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - कोणत्याही गोष्टीची मर्यादा ठरलेली असतेच. 
 
♦सारा गाव मामाचा पण एकही नाही कामाचा - जवळच्या खूप व्यक्ती आहेत पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे. 
 
♦साप साप म्हणून भुई थोपटू नये - संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे.
 
♦सुंभ जळाला तरी त्याचा पीळ जात नाही - स्वाभिमानी माणसावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपले तत्व सोडत नाही. 
 
♦सुंटी वाचून खोकला जाणे - उपचाराशिवाय दोष कमी होणे.  
 
♦सुतासाठी मणी फोडणे बरोबर नाही - क्षुल्लक वस्तु वाचविण्यासाठी मौल्यवान वस्तूचा नाश करू नये.
 
♦हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवणे - आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे परस्पर दुसर्‍याची वस्तू तिसर्‍याला देणे.
 
♦हसतील त्याचे दात दिसतील - चांगले काम करताना टिंगल करणार्‍यांची पर्वा न करणे.
 
♦हपापाचा माल गपापा - कोणाचे फुकट घेतलेले तसेच जाणे. 
 
♦हत्ती गेला नि शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडासा भाग शिल्लक राहिला. 
 
♦हत्तीच्या पायी येते अन मुंगीच्या पायी जाते - कोणतीही गोष्ट येताना ती खूप लवकर येते पण जाताना मात्र हळूहळू जाते. 
 
♦हाजीर तो वजीर - जो वेळेवर उपस्थित असतो त्याचाच फयदा होतो. 
 
♦हातच्या काकणांला आरसा कशाला? - स्पष्ट असणार्‍या गोष्टीला पुरावा कशाला? 
 
♦हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे (वसे) - दिर्घोद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. 
 
♦ह्या हातचे त्या हातावर - वाईट कृत्याची फळे ताबडतोब मिळतात.
 
♦हा सूर्य हा जयद्रथ - प्रत्यक्ष पुरावा दाखवून एखादी गोष्ट सिद्ध करणे.
 

 

 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ) -20


🩸म्हणी भाग 20🩸

🩸वेळ ना वारी गाढव आले दारी - मूर्खाला योग्य अयोग्य प्रसगाचे भान नसते. 
 
🩸वाघ म्हटले तरी खातोच नि वाघोबा म्हटले तरी खातोच - एखाद्या बरोबर आपण कितीही चांगले वागा पण तो आपला स्वभाव सोडणारच नाही, त्याचा गुण दाखवणारच.
 
🩸शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला समजावून सांगितल्यावर तो ऐकतो.
 
🩸शेरास सव्वाशेर - एखाद्याचा गर्व कमी करण्यासाठी वरचढ माणूस भेटणे. 
 
🩸शितावरून भाताची परीक्षा - थोड्याशा गोष्टीवरून मोठ्या गोष्टीची परीक्षा होते.
 
🩸शेंडी तुतो वा पारंबी तुटो - पक्का निश्चय करणे. 
 
🩸शिंक्याचे तुटले नि बोक्याचे फावले - एकाचा तोटा तोच दुसर्‍याचा फायदा होत असतो. 
 
🩸शेळी जाते जिवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी? - आपल्यासाठी अतोनात परिश्रम करताना त्रास सहन केला तरी त्याचा विचार न करता कामातील चुका शोधून काढणे. 
 
🩸सगळे मुसळ केरात - मुख्य गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यावर घेतलेले सर्व कष्ट वाया जातात. 
 
🩸सत्तेपुढे शहाणपण नाही - अधिकार शक्ती असलेल्या माणसापुढे कुणाचेच काही चालत नाही.
 
🩸साठी बुद्धी नाठी - म्हातारपण आले की बुद्धी चळते विवेकशक्ती कमी होते. 
 
🩸स्वार्थी आले अन शास्त्री गेले - स्वार्थापोटी विव्दता गेली.
 
🩸साखरेचे खाणार त्याला देव देणार - भाग्यवानाला कशाचीही कमतरता पडत नाही
 
🩸सन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी - न होणार्‍या कामाची तयारी प्रारंभापासून करणे. 
 
🩸सर्व सोंग करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही - जी स्थिती नाही तिची बतावणी करणे कठीण जाते
 

 

 

 

 

 

⭕स्पर्धा परीक्षा उपयुक्त (ध्वनीदर्शक शब्द) -1⭕


🩸ध्वनिदर्शक शब्द🩸

🦋प्राणी/पक्षी शब्द🦋
📒वाघाची➡ डरकाळी
📒कोल्हयांची ➡कोल्हेकुई
📒गाईचे➡ हंबरणे
📒गाढवाचे➡ ओरडणे
📒घुबडाचा➡ घूत्कार
📒घोडयाचे➡ किंचाळणे
📒चिमणीची➡ चिवचिव
📒कबुतराचे/पारव्याचे➡ घुमणे
📒कावळ्याची➡ कावकाव
📒सापाचे➡ फुसफुसने
📒हत्तीचे➡ चित्कारणे
📒हंसाचा➡ कलख
📒भुंग्यांचा, मधमाश्यांचा➡ गुंजारव
📒माकडांचा➡ भुभु:कार
📒म्हशींचे➡ रेकणे
📒मोराचा➡ केरकाव 
📒मोरांची➡ कैकावली
📒सिंहाची➡ गर्जना
📒पंखांचा➡ फडफडाट
📒पानांची➡ सळसळ
📒डासांची➡ भुणभुण
📒रक्ताची➡ भळभळ
 

 

शनिवार, 29 मई 2021

*आरोग्य*

 



*हसणे आणि हसवणे आपल्या सवयीमध्ये सामिल करा* 


👉हसत राहिल्याने शरीर आणि मनात उत्साहाचा संचार होतो. मनापासून हसणे तर एखाद्या औषधाप्रमाणेच आहे. हे एका उत्तम टॉनिकचे काम करते. त्यामुळे आजच्या धावपळीच्या जीवनात तणावापासून मुक्ती

मिळविण्या साठी जागोजागी हास्य क्लब बनविले जात आहेत. 


👉बोलताना जितका ऑक्सिजन घेतला जातो, त्यापेक्षा सहापट अधिक ऑक्सिजन हसताना घेतला जातो. म्हणजे नुसत्या हसण्यातून शरीराला जास्त

👉ऑक्सिजन मिळतो. मानसोपचार तज्ज्ञदेखील तणावग्रस्त व्यक्तींना सतत हसत राहण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते हसताना तुमचा मेंदू विचार करू लागतो, की तुम्ही आनंदात आहात. ही प्रक्रिया पूर्ण शरीरात प्रवाहीत होते. आणि तुम्हाला रिलॅक्स वाटायला लागते. 


👉तुम्ही हसणे सुरू करतात तेव्हा तुमच्या शरीरात रक्ताभिसरण तीव्र गतीने होतो. तणावातही हसत राहण्याची क्षमता असेल तर दु:खही कमी वाटायला लागतात. 


*हसण्यामुळे इतरही फायदे होतात..*.


*हसताना राग येत नाही.

*हसत राहिल्याने आनंद मिळतो.

*शरीरात नव्या स्फूर्तीचा संचार होतो.

*हसण्याने मनात उत्साहाचा संचार होतो.

*ब्लडप्रेशर कमी होते.

*हसणे दु:ख दूर करते.

*हसण्याने शरीरासोबतच मेंदूचाही व्यायाम होतो.


👉हसणे-हसविणे आपल्या सवयीमध्ये सामील करा आणि मग पाहा तणाव तुमच्या आसपासही दृष्टीस पडणार नाही. त्यासोबतच तुमचे आरोग्यही चांगले राहील.

🏵स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-19) 🏵


🏵म्हणी भाग 19🏵

🏵लकडी वाचून मकडी वळत नाही - खोडकरपणा बंद करण्यासाठी सरळ उपाय जमत नाही. तर त्यासाठी कडक शिक्षा करावी लागते. 
 
🏵लेकी बोले सूने लागे - एखाद्याला उद्द्येशून पण दुसर्‍याला लागेल असे बोलणे.
 
🏵लोका संगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण - लोकांना उपदेश द्यायचा पण स्वत:मला तसे वागायचे नाही.
 
🏵वडयाचे तेल वांग्यावर - एकाबदल दुसर्‍याला दोष देणे.
 
🏵वारा पाहून पाठ फिरवणे - परिस्थिती पाहून वर्तन करणे.
 
🏵वळणाचे पाणी वळणावर जाणे - निसर्ग नियमाप्रमाणे वागतो तर माणूस आपल्या संस्कारा प्रमाणे, स्वभावानुसार वागतो. 
 
🏵वराती मागून घोडे - एखादी घटना घडल्यावर मदतीस धावून येणे.
 
🏵वासरात लंगडी गाय शहाणी - निरक्षर माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणारा ही शहाणा ठरतो. 
 
🏵व्यक्ती तितक्या प्रकृती - प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. 
 
🏵व्याप तितका संताप - कामाचा बोजा जेवढा अधिक तेवढी जबाबदारी मोठी असते. 
 
🏵विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर - आवश्यक त्या वस्तु सोबत घेऊन फिरणे. 
 
🏵विशी विद्या तिशी धन - योग्य वेळी केलेला कामाचा कालांतराने फायदा होतोच.
 
🏵वाहत्या गंगेत हात धुणे - परिस्थिती अनुकूल असली की फायदा करून घेणे.
 
🏵वाघाच्या घरी शेळी पाहुणी - चांगला माणूस वाईट मानसाच्या तावडीत सापडतो.
 

 

 

 

 

📗स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-18) 📗


🩸म्हणी भाग 18🩸

🩸यथा राजा तथा प्रजा - प्रमुख किंवा मोठ्या माणसाच्या वर्तणूकीचा प्रभाव सर्व सामन्यावर पडतो.
 
🩸ये रे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या - एखाद्याने केलेला उपदेश न ऐकता पूर्वी प्रमाणेच वागणे 
 
🩸या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे - एखाद्याला फसवणे, बनवाबनवी करणे 
 
🩸यत्न तो देव जाणावा - प्रयत्न करणे महत्वाचे असते. 
 
🩸राईचा पर्वत करणे - एखादी क्षुल्लक गोष्ट अतिशयोक्ती करून सांगणे 
 
🩸राजाला दिवाळी काय अन दसरा काय? - रोजच्याच गोष्टीची नवलाई नसते, सणांचे महत्व काय. 
 
🩸रात्र थोडी सोंगे फार - वेळ थोडा आणि कमी वेळात कामे खूप असणे. 
 
🩸रिकामा न्हावी भिंतीना तुंबडया लावी - उद्योगी माणूस नेहमी प्रयत्न करतो, तो कधीही गप्प बसत नाही.
 
🩸रोज मरे त्याला कोण रडे - नेहमी घडणार्‍या गोष्टी विषयी स्वारस्य वाटत नाही. 
 
🩸लाज नाही मना कोणी काही म्हणा - निर्लज्ज माणूस दुसर्‍याच्या टीकेची पर्वा करत नाही.
 
🩸लाथ मारीन तेथे पाणी काढीन - स्वत:च्या बळावर एखादे काम पूर्ण करण्याची खात्री असणे. 
 
🩸लहान तोंडी मोठा घास - आपली योग्यता नसताना मोठ्यांना सल्ला देणे. 
 
🩸लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याचे गोष्टीचा आपणाला उपयोग नसतो. 
 
🩸लष्कराच्या भाकर्‍या भाजणे - बिनफायदाचा आणि निरर्थक उद्योग करणे.
 

 

🌹स्पर्धा परीक्षा उपयुक्त (म्हणी व अर्थ-17) 🌹


📗म्हणी भाग 17📗

📗मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये - कोणाच्याही चांगुल पणाचा वाटेल तेवढा फायदा घेऊ नये.
 
📗मरावे परी कीर्तीरूपे उरावे - आपल्या नंतरही कीर्ती राहील असे कार्य करावे
 
📗मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला - आपला सन्मान लोकांना सांगावा पण अपमान झाला तर कोणालाही सांगू नये. 
 
📗माकडाच्या हातात कोलीत - विघ्नसंतोषी माणसाला कारभार देणे.
 
📗मनाची नाही पण जनाची तरी - एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल? असा विचार करावा. 
 
📗मनास मानेल तोच सौदा - आपणाला आवडेल तीच गोष्ट करावी. 
 
📗मानला तर देव नाही धोडा - कोणालाही महत्व द्यायचे किंवा न द्यायचे आपल्या मनावर अवलंबून असते.
 
📗मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी - अवघड काम करण्यासाठी कोणीही माणूस तयार होत नाही.
 
📗मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहानपणीच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुणदोषांचे दर्शन होते. 
 
📗म्हशीची शिंगे म्हशीला जड नसतात - कितीही अडचण आली तरीही आपली माणसे आपणाला नकोशी होत नाहीत. 
 
📗मोले घातले रडाया नाही आसू नाही माया - मोबदला घेऊन काम करणार्‍यामध्ये खरीखुरी आत्मियता नसते. 
 
📗मौनम सर्वार्थ साधनम - बडबड करण्यापेक्षा गप्पा बसणे सर्वात उत्तम.
 
📗मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव - कष्ट (कर्म) न करता फळ मागण्याची पद्धत