Ubed Shaikh Deoni(Latur)

गुरुवार, 7 जनवरी 2021

म्हणी व अर्थ Ubed Shaikh Deoni, Latur.

〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓〓 
        ┎═══════════┒
         ▌ ✺स्पर्धा परीक्षा✺    ▌
        ┗═══════════┛
              🪐म्हणी व अर्थ🪐
 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 

🔰निंदकाचे घर असावे शेजारी -➡ निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्याच्यामुळे आपले दोष आपल्याला कळतात. 
 
🔰पळसाला पाने तीनच ➡- सगळीकडे परिस्थिती एक सारखीच असणे.
 
🔰पर दु:ख शीतळ ➡- दुसर्‍याच्या दु:खाची खरी कल्पना येत नाही.  

🔰पदरी पडले खोड हसून करावे गोड ➡- स्वीकारलेल्या गोष्टीला नाव न ठेवता हसून समाधान माणने 
 
🔰पडत्या फळाची आज्ञा - आपल्या समोरील प्रसंग शिरसावंद्य माणून काम करणे. 
 
🔰पाचमुखी परमेश्वर ➡- बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे. 
 
🔰पाचही बोटे सारखी नसतात -➡ सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात. 

🔰प्रयत्नांती परमेश्वर ➡- कितीही कठीण गोष्ट असली तरी अथक प्रयत्नानंतर ती साध्य होते म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवावे. 
 
🔰पालथ्या घड्यावर पाणी ➡- एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे. 
 
🔰पाप्याला पंढरपूर आळशेल्याला गंगादूर - ➡श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही. 
 
🔰पाय धू तर म्हणे तोंड केवढ्याचे -➡ सांगितलेले काम सोडून नको त्या गोष्टी करणे.

🔰प्राणावर आले होते:पण शेपटावर निभावले - ➡जिवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचने. 

🔰पायाची वहाण पायीच बरी -➡ एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक महत्व देऊ नये. 
 

🔰ळणार्‍याला एक वाट तर शोधणार्‍याल बारा वाटा ➡- लबाडी करणे फार सोपे पण ती शोधून काढणे खूप कठीण असते. 
 
🔰पडलेले शेण माती घेऊन उठते -➡ चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे कितीही जारी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.

 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
          संकलन-
✍️🅤 🅑 🅔 🅓 
 🅢 🅗 🅐 🅘 🅚 🅗
  🅓 🅔 🅞 🅝 🅘 
(🅛 🅐 🅣 🅤 🅡 ) ✍️

〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓 〓
    

गुरुवार, 29 अक्टूबर 2020

म्हणी व अर्थ स्पर्धा परीक्षा

*✲✪✪༻🅜 🅢 🅟༺✲✪✪༻*
     ⏺️महाराष्ट्र शिक्षक पॅनल⏺️ 
        ┎═══════════┒
         ▌ ✺स्पर्धा परीक्षा✺      ▌
        ┗═══════════┛
        
             📘म्हणी व अर्थ📘2️⃣
⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑⋐⋑

➊आचार भ्रष्टी सदा कष्टी
👉- ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. 
 
➋आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली
 👉- अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. 
 
➌आईचा काळ बायकोचा मवाळ
👉 - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा
 
➍आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
👉 - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. 
 
➎आपलेच दात आपलेच ओठ
 👉- आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. 
 
➏अंथरूण पाहून पाय पसरावे
 👉- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. 
 
➐आवळा देऊन कोहळा काढणे
 👉- क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. 
 
➑आलीया भोगाशी असावे सादर
 👉- कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.
 
 
➒अचाट खाणे मसणात जाणे
 👉- खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो.
 
 
➓आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते
 👉- अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते.
 
➊➊आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला
 👉- ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. 
 
➊➋आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं
👉 - स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. 
 
➊➌अळी मिळी गुप चिळी
 - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. 
 
➊➍अहो रूपम अहो ध्वनी
 - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.
  ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    *पोस्ट क्रमांक:-7️⃣1️⃣3️⃣*
          संकलन-
   *✍️𝓤 𝓫 𝓮 𝓭  𝓢 𝓱 𝓪 𝓲 𝓴 𝓱*
 *𝓓 𝓮 𝓸 𝓷 𝓲 (𝓛 𝓪 𝓽 𝓾 𝓻 )* ✍️

      *✲✪✪༻🅜 🅢 🅟 ༺✲✪✪༻*  
     *▂ ▃ ▄ महाराष्ट्र शिक्षक पॅनल*  ▅ ▄ ▃