गुरुवार, 28 अप्रैल 2022
रविवार, 3 अप्रैल 2022
बुधवार, 30 मार्च 2022
राज्य शासकीय कर्मचारीअपघाती विमा योजना माहिती व कोरा फाॅम
राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तीक अपघात विमा महाराष्ट्र संवर्गातील भारतीय प्रशासन सेवेतील, भारतीय पोलीस सेवेतील व वन सेवेतील अधिकारी तसेच सर्व राज्य शासकीय सर्व कर्माचारी यांना व प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना देखील लागू करण्यात येत आहे.
सर्व कर्मचाऱ्याना सन-2017 पासून सदर योजना लागू केलेली आहे.
लाभार्थी
सर्व शासकीय कर्मचारी
वर्गणी
वार्षिक वर्गणी रू.354 / - कपात करण्यात येते. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात या रकमेची कपात पगारातून केली जाते
बुधवार, 16 मार्च 2022
शनिवार, 5 मार्च 2022
8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध घोषवाक्य
🎤8 मार्च जागतिक महिला दिन या दिनानिमित्त प्रभातफेरीत द्यावयाच्या घोषणा🎤
📼📼📼📼📼📼📼📼📼📼📼
🎱स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान
🎱नारी आता अबला नाही, कारण अजून आमचा संघर्ष काही संपला नाही
🎱जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही
🎱नारीत आहे शक्ती भारी, तुम्ही तिला का समजता बिचारी
🎱ती वस्तू नाही भोगाची तर देवता आहे सगळ्यात मोठ्या त्यागाची
🎱करु नका कधीही महिलांचे शोषण, नाहीतर देशाचे होईल कुपोषण
🎱मुलींना द्या शिक्षणाचा अधिकार, करेल तुमच्या पिढ्यांचा उद्धार
🎱स्त्रियांना समजू नका बेकार, कारण त्याच आहे जीवनाचा आधार
🎱नारी घे तू उंच भरारी, फिरुन पाहू नकोस तू माघारी
स्त्रियांना चढू द्या शिक्षणाची पायरी
🎱शिकून सवरुन करतील रोशन दुनिया सारी
महिलांना द्या सन्मान, देश बनेल नक्कीच महान
🎱सशक्त नारी घडवते सशक्त समाज
द्या शिक्षणाला गती, व्हा फुले सावित्री
🎱होईल स्त्रियांची प्रगती तरच होईल जगाची प्रगती
🎱द्याल स्त्रियांना मान- सन्मान, मिळेल तुम्हाला प्रेमाचा मान
🎱सुख, समृद्धीचा झरा… स्त्रियांसाठी शिक्षणाचा मार्गच खरा
🎱अरे शिक्षण, शिक्षण.. आधी हाती घेऊ लेखन…तेव्हा होईल खरा सुखी संसार सुरु
🎱मुलीचे शिक्षण, प्रगतीचे लक्षण
🎱नर असो वा नारी, चढा शिक्षणाची पायरी
🎱शिक्षण हाच आहे जीवनाचा खरा अर्थ, त्याशिवाय जीवन आहे व्यर्थ
🎱मुलासारखे मुलीला शिक्षीत करु, दोघांमधला भेदभाव दूर सारु
🎱माता होईल शिक्षित, तर देश राहील सुरक्षित
🎱स्त्री शिक्षणाची धरा कास, देशाचा होईल विकास
🎱शिक्षणाचा आहे सगळ्यांना अधिकार, महिलांनाही द्या त्यांचा हा अधिकार
🎱मुलगी शिकली, प्रगती झाली
🎱मुलींचा जन्म हा लक्ष्मी, सरस्वतीच्या जन्मासारखा आहे, व्यर्थ जाऊ देऊ नका
🎱मुलगा मुलगी एक समान, द्यावे त्यांना शिक्षण छान
🎱शिक्षणाच्या दानाने सोडवला बंधनाचा फास, स्त्री घेत आहेत आता मोकळा श्वास
गुरुवार, 3 फ़रवरी 2022
जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारी
World Cancer Day 'जागतिक कर्करोग दिवस'
निमित्त जाणून घ्या कर्करोगाचे विविध प्रकार आणि कारणे
प्रत्येक वर्षी 4 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' (World Cancer Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे मुख्य हेतू म्हणजे, कॅन्सरबाबत जागरूकता पसरवणं. सध्या जगभरात लोकांच्या मृत्यूचं प्रमुख कारण कॅन्सर ठरत आहे. प्रत्येक 6 मृत्यूंपैकी एका व्यक्तीचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो. त्यामुळे लोकांमध्ये कॅन्सरबाबत जागृती असणे गरजेचे आहे.
आपले शरीर हे पेशींपासून बनलेले आहे. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग होतो. या पेशी वारंवार विभागल्या जातात. तर काही वेळेस विभाजनाच्या वेळी पेशींमध्ये गाठ निर्माण होते. बिनाइन आणि मॅलिग्नेंट या दोन पद्धतीची गाठ असू शकते. बिनाइन ही गाठ धोकादायक नसून म्रलिग्नेंट या गाठीचे कँन्सरमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे
कर्करोगाचे विविध प्रकार -
सौम्य कर्करोग -
या विकारात ट्यूमरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरून नवीन गाठी तयार होत नाहीत. ही गाठ सहज काढून टाकता येते. म्हणूनच हा ट्यूमर प्राणघातक नाही
घातक कर्करोग -
या कर्करोगाच्या गाठी सभोवताच्या व दूरवरच्या अवयावांमध्ये रक्तवाहिन्या आणि लसिका संस्थेच्या माध्यमातून शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतात. त्यामुळे हा कर्करोग घातक ठरण्याची शक्यता असते. हा कर्करोग उद्धभवल्यामुळे मृत्यूही होऊ शकतो.
स्त्रियांमध्ये आढळून येणारे कर्करोग -
स्त्रियांमध्ये प्रामुख्याने स्तन, फुप्फुसे, मोठे आतडे, गर्भाशय आणि थायरॉइड या अवयवांमध्ये कर्करोग आढळून येतो.
पुरुषांमध्ये आढळून येणारा कर्करोग -
पुरुषांमध्ये प्रोस्टेट, फुप्फुसे, मोठे आतडे आणि मूत्राशयाचा कर्करोग आढळून येतो.
कर्करोगाची कारणे -
तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानाचे व्यसन केल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसेच दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाची शक्यता असते. स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्यांचा कर्करोग हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनुकीय बदल होऊन कर्करोग होऊ शकतो. तसेच आहार-अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू, गुटखा, धूम्रपान, तेलकट अन्न आदी पासून दूर राहा आणि कर्करोगापासून स्वत:चं सरंक्षण करा.
शनिवार, 15 जनवरी 2022
स्पर्धा परीक्षा उच्चार सारखे परंतु अर्थ वेगळा
♦ओढ - कल, कम
♦ओज - तेज, पाणी
♦ओज - तेज, पाणी
♦ओज - तेजस्विता, बळ
♦ओळख - परिचय
♦ओळख - माहिती, जामीन
♦औस - पुजारी
♦कंकाल - आस्थीपंजर, कृश
♦कंगाल - गरीब
♦कच्च - लहान खळगा, चलमा
♦कच्चा - अपरिपक्व
♦कचरा - घाण
♦कचार - काचकाम करणारा
♦कंचुक - अंगरखा बंडी
♦कंचुक - चोळी, कवच
♦कटकट - किरकिर, गडबड
♦कटकट - त्रास, भांडण
♦कंठ - गळा, घाटी
♦कंठ - स्वर, नरडी
♦कणव - द्या, करुणा
♦कवण - काव्य
♦कनक - सोने
♦कन्नक - कणखर
♦कष्टी - मेहनती
♦कष्टी - थकलेला
सदस्यता लें
संदेश (Atom)
-
〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓〓 ┎═══════════┒ ▌ ✺ स्पर्धा परीक्षा✺ ▌ ┗═══════════┛ 🪐...