🏵म्हणी भाग 19🏵
🏵लकडी वाचून मकडी वळत नाही - खोडकरपणा बंद करण्यासाठी सरळ उपाय जमत नाही. तर त्यासाठी कडक शिक्षा करावी लागते.
🏵लेकी बोले सूने लागे - एखाद्याला उद्द्येशून पण दुसर्याला लागेल असे बोलणे.
🏵लोका संगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण - लोकांना उपदेश द्यायचा पण स्वत:मला तसे वागायचे नाही.
🏵वडयाचे तेल वांग्यावर - एकाबदल दुसर्याला दोष देणे.
🏵वारा पाहून पाठ फिरवणे - परिस्थिती पाहून वर्तन करणे.
🏵वळणाचे पाणी वळणावर जाणे - निसर्ग नियमाप्रमाणे वागतो तर माणूस आपल्या संस्कारा प्रमाणे, स्वभावानुसार वागतो.
🏵वराती मागून घोडे - एखादी घटना घडल्यावर मदतीस धावून येणे.
🏵वासरात लंगडी गाय शहाणी - निरक्षर माणसांमध्ये थोडेसे ज्ञान असणारा ही शहाणा ठरतो.
🏵व्यक्ती तितक्या प्रकृती - प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो.
🏵व्याप तितका संताप - कामाचा बोजा जेवढा अधिक तेवढी जबाबदारी मोठी असते.
🏵विंचवाचे बिर्हाड पाठीवर - आवश्यक त्या वस्तु सोबत घेऊन फिरणे.
🏵विशी विद्या तिशी धन - योग्य वेळी केलेला कामाचा कालांतराने फायदा होतोच.
🏵वाहत्या गंगेत हात धुणे - परिस्थिती अनुकूल असली की फायदा करून घेणे.
🏵वाघाच्या घरी शेळी पाहुणी - चांगला माणूस वाईट मानसाच्या तावडीत सापडतो.