🧿म्हणी भाग 8🧿
🧿चोराच्या उलटया बोंबा - स्वत:च गुन्हा करून दुसर्यावर आळ घेणे.
🧿चोराच्या मनात चांदणे - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.
🧿चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसर्यावर कडी करणे.
🧿जळत्या घराचा पोळता वासा - प्रचंड नुकसानीतून जे वाचले ते आपले म्हणून समाधान मानावे.
🧿जलात राहुन माशांशी वैर करू नये - ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करून नये.
🧿जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला - निरक्षर किंवा निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्टामध्येच जाते.
🧿जळत घर भाड्याने कोण घेणार - नुकसान करणार्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार.
🧿जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसर्याच्या स्थितीत आपण स्वत:जावे, तेव्हा तिचे खरे ज्ञान आपणास होते.
🧿ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या बाभळी - एकमेंकाचे वर्म माहीत असणार्या माणसांशी गाठ पडणे.
🧿ज्याचे खावे मीठ त्याचे करावे निट - जो आपल्या वर उपकार करतो त्या उपकार कर्त्याला स्मरण करून त्याच्या यशासाठी प्रयत्न करावेत.
🧿जशी देणावळ तशी धुणावळ - मिळणार्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.
🧿ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे - एखाद्याचे भले करायला जावे तर तो विरोधच करतो व आपलाच हेका चालवतो.
🧿जी खोड बाळ ती जन्मकळा - लहानपणीच्या सवयी जन्मभर टिकतात.
🧿ज्याच्या हाती ससा तो पारधी - ज्याला यश मिळाले तो कर्तबगार