📼म्हणी भाग 7📼
📼गोगलगाय नि पोटात पाय - एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे.
📼गोरागोमटा कपाळ करंटा - दिसायला देखणा पण नशिबाने दुर्दैवी व्यक्ती.
📼घर ना दार देवळी बिर्हाड - बायको पोरे नसणारा एकटा पुरुष किंवा शिरावर कोणतीही जाबाबदारी नसलेली व्यक्ती.
📼घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात - एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याबरोबर वाईटपणे वागू लागतात.
📼घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे - स्वत:च्या कामाचा व्याप अतोनात असताना दुसर्यांने आपलेही काम लादणे.
📼घर पहावे बांधून लग्न पहावे करून - अनुभवाने माणूस शहाणा होतो.
📼घटका पाणी पिते घड्याळ टोले खाते - आपापल्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात.
📼घरोघरी मातीच्याच चुली - सर्वत्र सारखीच परिस्थिती अनुभवास येणे.
📼घोडे खाई भाडे - धंद्यात फायद्यापेक्षा खर्च जास्त.
📼चढेल तो पडेल - गर्विष्ठ माणसाचा गर्व उतरल्याशिवाय राहत नाही.
📼चालत्या गाडीला खीळ - व्यवस्थीत चालणार्या कार्यात अडचण निर्माण होणे.
📼चमत्काराशिवाय नमस्कार नाही, पराक्रमावाचून पोवाडा नाही - लोकांना काही विशेष कार्य करून दाखविल्याशिवाय लोक मान देत नाहीत.
📼चिंती परा येई घरा - दुसर्याबदल मनात वाईट विचार आलेकी स्वत:चेच वाईट होते.
📼चोर सोडून सान्याशाला फाशी - खर्या गुन्हेगाराला शासन न करता दुसर्याच निरपराध माणसाला शिक्षा देणे.