🌄म्हणी भाग 6 🌄
🌄खोट्याच्या कपाळी गोटा - वाईट कृत्य करणार्याला माणसाचे शेवटी वाईटच होते.
🌄गरजवंताला अक्कल नसते - गरजेमुळे अडलेल्या व्यक्तीला इतरांच्या म्हणण्यापुढे मान डोलवावी लागते.
🌄गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती होतेच.
🌄गरज सरो नि वैद्य मरो - आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
🌄गर्जेल तो पडेल काय - केवळ गाजावाजा करणार्या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
🌄गाढवाला गुळाची चव काय - मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही.
🌄गाढवांचा गोंधळ, लाथांचा सुकाळ - मूर्ख लोक एकत्र आल्यावर मूर्खपणाचेच कृत्य करणार.
🌄गाव करी ते राव ना करी - श्रीमंत व्यक्ति स्वत:च्या बळावर जे करू शकत नाही ते एकीच्या बळावर सामान्य माणसे करू शकतात.
🌄गाड्याबरोबर नळ्याची यात्रा - मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
🌄गाढवापुढे वाचली गीता अन कालचा गोधळ बारा होता - मूर्खाला केलेला उपदेश वाया जातो.
🌄गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच नाही तर तिचा दूसरा उपयोग करून घेणे.
🌄गाढवाच्या पाठीवर गोणी - एखाद्या गोष्टीची अनूकुलता असून उपयोग नाही. तर तिचा फायदा घेता यायला हवा.
🌄गुरुची विद्या गुरूला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.
🌄गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य - ज्याची वस्तु त्यालाच भेट देणे.