Ubed Shaikh Deoni(Latur)

शनिवार, 22 मई 2021

📓स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-5) 📓


📓शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 5 बद्दल माहिती📓

जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे - आभास
 
⭕ज्याला मरण नाही असा - अमर 
 
⭕कमी वेळ टिकणारा - अल्पजीवी 
 
⭕कमी आयुष्य असणारा - अल्पसंतुष्ट 
 
⭕ज्याचा विसर पडणार नाही - अविस्मरणीय 
 
⭕शब्दामधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे - अवर्णनीय 
 
⭕कधीही नाश न पावणारे - अविनाशी
 
⭕ज्याने लग्न केले नाही असा - ब्रम्हचारी
 
⭕ज्याचा कधीही वाट येत नाही - अवीट 
 
⭕एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा - अष्टावधानी 
 
⭕एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा - अनन्यभक्ती 
 
⭕ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे - अव्दैत
 
⭕आकाशातील तार्‍यांचा पट्टा - आकाशगंगा 
 
⭕कुस्ती खेळण्याची जागा - आखाडा 
 
⭕सूचना न देता येणारा पाहुणा - आगंतुक

🦋स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-4) 🦋


⭕शब्दसमूहाबद्दल एक शब्द भाग 4 बद्दल माहिती⭕

कोणत्याही पक्षात सामील न होणारा - अपक्ष 
 
निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था - अनाथाश्रम
 
एकाला उद्देशून दुसर्‍याला बोलणे - अन्योक्ती 
 
देव लोकातील स्त्रिया - अप्सरा 
 
स्वत:चाच फायदा पाहणारा - अप्पल पोटा 
 
पूर्वी कधीही पडले नाही असे - अपूर्व 
 
टाळता येणार नाही असे - अपरिहार्य 
 
वस्तूच्या दाट सावली भोवती असणारी धूसर (छाया) सावली - अपछाया 
 
पिठआंबवून तव्यावर बनविलेले धिरडे - अंबोळी
 
हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, बैठक - अंबारी 
 
खिळे उपटण्याची पकड - अंबूर 
 
लहानापासून म्हतार्‍यापर्यंत - अबालवृद्ध 
 
सुरक्षितेचे दिलेले वचन - अभय 
 
ज्याची कमतरता आहे असे - अभाव 
 
पूर्वी कधीही न घडलेले - अभूतपूर्व

🔰स्पर्धा परीक्षा उपयुक्त (शब्दसमूहाबद्दल एक शब्द-3) 🔰

🎯विराजमान झालेला - अधिष्ठित 
 
🎯जारी केलेली सूचना - अधिसूचना 
 
🎯पूर्वी कधीही न पाहिलेले - अदृष्टिपूर्व 
 
🎯खाली तोंड केलेला, लज्जित, खिन्न - अधोमुख 
 
🎯नंतर जन्मलेला (धाकटा भाऊ) - अनुज
 
🎯मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण - अन्नछत्र 
 
🎯मागून जन्मलेली बहीण - अनुजा 
 
🎯केलेल्या कृत्याबद्दल वाटणारा पाश्चाताप - अनुताप 
 
🎯वरच्या जातीचा पुरुष व खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह - अनुलोम विवाह 
 
🎯अन्नदान करणारा - अन्नदाता 
 
🎯ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा - अनुपम अनुपमेय 
 
🎯ज्याचा आरंभ माहीत नाही - अनादि 
 
🎯अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट - अनपेक्षित 
 
🎯ज्याला आई-वडील नाहीत असा - अनाथ 
 
🎯ज्याची किंमत होऊ शकत नाही असा - अनमोल
 

 

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (राष्ट्रगीताबद्दल माहिती)




📓📓राष्ट्रगीताबद्दल माहिती📓📓

🦋१) राष्ट्रगीत (National Anthem) : रविंद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली भाषेत लिहिलेले ‘ जन-गण-मन ’ या गाण्याच्या हिंदी रुपांतरनाचे संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्विकार केला.

🦋२) २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय कोंग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले.

🦋३) राष्ट्रगीतामध्ये एकूण पाच कडवे असून हे गीत पूर्णपणे ५२ सेकंदामध्ये म्हणण्याची प्रथा आहे.

🦋४) काही वेळेस हे गीत संक्षिप्त रुपात गायले जाते त्याचा कालावधी २० सेकंद आहे.

🦋५) जन-गण-मन हे गीत पहिल्यांदा जानेवारी १९१२ मध्ये ‘ भारत विधाता ’ या शीर्षकाखाली ‘ तत्व बोधिनी ’ पत्रिकेमध्ये छापले गेले होते.

🦋६) १९१९ मध्ये या गीताचे इंग्रजीमध्ये रुपांतरण करून ‘ Morning song of India ’ या नावाने छापले गेले.

🦋७) राष्ट्रीय गीत (National Song ) : बंकिमचंद्र चटर्जी यांचे ‘ वंदे मातरम ’ हे संस्कृतमधील गीत स्वातंत्र्य लढ्यातील लोकांसाठी प्रेरणेचे स्त्रोत होते.

🦋८) राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांना समान दर्जा आहे.

🦋९) १८९६ च्या भारतीय कोंग्रेसच्या अधिवेशनामध्ये हे सर्वप्रथम गायले गेले होते.

🦋१०) बंकिमचंद्र चटर्जी यांच्या १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ आनंदमठ ’ या कादंबरीतून घेतले असून याचे इंग्रजीमध्ये भाषांतर श्री. अरबिंदो यांनी केले आहे.

 

 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-4)


📓समूहदर्शक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती📓

♦वाचकांचा - मेळावा 
 
♦जळतणाची - मोळी
 
♦उसांची - मोळी
 
♦मधमाशांचे - मोहोळ 
 
♦मुंग्यांची - रांग
 
♦धान्याची - रास 
 
♦आंब्याच्या झाडांची - राई 
 
♦धावांचा, दुधाचा - रतीव 
 
♦रोपांची - रोपवाटिका 
 
♦गुरुद्वार्‍यातील भक्तासाठी प्रसाद (जेवण) - लंगर 
 
♦भाताची - लोंबी 
 
♦केळीचा - लोंगर 
 
♦झाडाझुडपांचे - वन 
 
♦वाद्य वाजविणार्‍यांचा - वाद्यवृंद 
 
♦उपकरणांचा - संच 
 
♦खेळाडूंचा - संघ 
 
♦कवितांचा, लेखांचा - संग्रह 
 
♦नाण्यांचा - संग्रह 
 
♦आदिवासीचा - समूह 
 
♦कार्यकर्त्यांची - संघटना 
 
♦लोकप्रतिनिधींची - संसद
 
♦ग्रंथ प्रेमीचे - साहित्य संमेलन
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-3)


📕समूहदर्शक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती📕

पोत्यांची - थप्पी 
 
वारकर्‍यांची - दिंडी
 
पैशांचा - दौलतजादा 
 
विचारवंतांची - परिषद 
 
पैशांचा - पाऊस 
 
सैनिकांची - पलटण, पथक 
 
तारकांचा - पुंज 
 
नोटांचे - पुंडके
 
गवताची - पेंढी 
 
नारळाची - पेंड 
 
केसांचा - पुंजका 
 
बालवीरांचे - पथक 
 
वेळूचे - बन
 
बांबूचे - बेट 
 
केसांची - बट
 
देवांचे गुणगान - भजन 
 
वस्तूंचे - भांडार 
 
नोटांची - भेंडोळी 
 
महिलांचे - मंडळ
 
सांस्कृतिक कार्यक्रमांचा - महोत्सव 
 
पणत्यांची - माळ
 
संतांची - मांदियाळी
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-2)



📔समूहदर्शक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती📔

♦ढगांचा - घनमंडल 
 
♦फळांचा - घोस 
 
♦मुलांचा, मुलींचा - घोळका 
 
♦माणसांचा - घोळका 
 
♦भाकरीची - चवड 
 
♦पोळयांची - चवड, चळत 
 
♦घरांची - चाळ 
 
♦केसांची - जट 
 
♦साधुंचा - जथा 
 
♦दुर्वाची - जुडी 
 
♦पालेभाजीची - जुडी 
 
♦करवंदाची - जाळी 
 
♦चाव्यांचा - जुडगा 
 
♦उतारुंची - झुंड 
 
♦केसांचा - झुबका 
 
♦प्रवाशांची - झुबड 
 
♦वानरांची, चोरांची - टोळी 
 
♦वाळूचा - ढीग 
 
♦मातीचा, विटांचा - ढिगारा 
 
♦फूल झाडांचा - ताटवा 
 
♦लमाणाचा - तांडा 
 
♦विमानांचा - ताफा 
 
♦पक्षांचा - थवा