Ubed Shaikh Deoni(Latur)

शनिवार, 22 मई 2021

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-4)


📓समूहदर्शक शब्द भाग 4 बद्दल संपूर्ण माहिती📓

♦वाचकांचा - मेळावा 
 
♦जळतणाची - मोळी
 
♦उसांची - मोळी
 
♦मधमाशांचे - मोहोळ 
 
♦मुंग्यांची - रांग
 
♦धान्याची - रास 
 
♦आंब्याच्या झाडांची - राई 
 
♦धावांचा, दुधाचा - रतीव 
 
♦रोपांची - रोपवाटिका 
 
♦गुरुद्वार्‍यातील भक्तासाठी प्रसाद (जेवण) - लंगर 
 
♦भाताची - लोंबी 
 
♦केळीचा - लोंगर 
 
♦झाडाझुडपांचे - वन 
 
♦वाद्य वाजविणार्‍यांचा - वाद्यवृंद 
 
♦उपकरणांचा - संच 
 
♦खेळाडूंचा - संघ 
 
♦कवितांचा, लेखांचा - संग्रह 
 
♦नाण्यांचा - संग्रह 
 
♦आदिवासीचा - समूह 
 
♦कार्यकर्त्यांची - संघटना 
 
♦लोकप्रतिनिधींची - संसद
 
♦ग्रंथ प्रेमीचे - साहित्य संमेलन
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-3)


📕समूहदर्शक शब्द भाग 3 बद्दल संपूर्ण माहिती📕

पोत्यांची - थप्पी 
 
वारकर्‍यांची - दिंडी
 
पैशांचा - दौलतजादा 
 
विचारवंतांची - परिषद 
 
पैशांचा - पाऊस 
 
सैनिकांची - पलटण, पथक 
 
तारकांचा - पुंज 
 
नोटांचे - पुंडके
 
गवताची - पेंढी 
 
नारळाची - पेंड 
 
केसांचा - पुंजका 
 
बालवीरांचे - पथक 
 
वेळूचे - बन
 
बांबूचे - बेट 
 
केसांची - बट
 
देवांचे गुणगान - भजन 
 
वस्तूंचे - भांडार 
 
नोटांची - भेंडोळी 
 
महिलांचे - मंडळ
 
सांस्कृतिक कार्यक्रमांचा - महोत्सव 
 
पणत्यांची - माळ
 
संतांची - मांदियाळी
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-2)



📔समूहदर्शक शब्द भाग 2 बद्दल संपूर्ण माहिती📔

♦ढगांचा - घनमंडल 
 
♦फळांचा - घोस 
 
♦मुलांचा, मुलींचा - घोळका 
 
♦माणसांचा - घोळका 
 
♦भाकरीची - चवड 
 
♦पोळयांची - चवड, चळत 
 
♦घरांची - चाळ 
 
♦केसांची - जट 
 
♦साधुंचा - जथा 
 
♦दुर्वाची - जुडी 
 
♦पालेभाजीची - जुडी 
 
♦करवंदाची - जाळी 
 
♦चाव्यांचा - जुडगा 
 
♦उतारुंची - झुंड 
 
♦केसांचा - झुबका 
 
♦प्रवाशांची - झुबड 
 
♦वानरांची, चोरांची - टोळी 
 
♦वाळूचा - ढीग 
 
♦मातीचा, विटांचा - ढिगारा 
 
♦फूल झाडांचा - ताटवा 
 
♦लमाणाचा - तांडा 
 
♦विमानांचा - ताफा 
 
♦पक्षांचा - थवा 
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-1)



📕समूहदर्शक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती📕

♦पिकण्यासाठी घातलेल्या आंब्यांची - आढी 
 
♦गव्हाची - ओंबी 
 
♦घरांची - आळी 
 
♦पणत्यांची - आरास 
 
♦तार्‍यांची - आकाशगंगा 
 
♦मडक्यांची - उतरंड 
 
♦फळझाडे व फूल झाडांचे - उपवन 
 
♦मेंढरांचा, हत्तीचा - कळप 
 
♦जहाजांचा - काफिला
 
♦वेलींचा - कुंज 
 
♦गुरांचा - कळप 
 
♦गायीचे - खिल्लार 
 
♦विद्यार्थ्यांचा - गट 
 
♦पुस्तकांचा - गठ्ठा
 
♦गवताची - गंजी 
 
♦माणसांची - गर्दी 
 
♦पालेभाजीची - गड्डी
 
♦माशांची - गाथण 
 
♦काजूची - गाथण 
 
♦फुलांचा - गुच्छ 
 
♦गाणे गाणार्‍यांचा - गानवृंद 
 
♦द्रक्षांचा, केळांचा - घड
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (महाराष्ट्र)



महाराष्ट्र : झलक -
महाराष्ट्र - स्थान,स्थापना,विभाग

* महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.

* महाराष्ट्राचे कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ हे चार प्रादेशिक विभाग आहेत.

* महाराष्ट्राचे स्थान पश्चिम भारतात असून अक्षांश १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर, तर रेखांश ७२.६ पूर्व तर ८०.९ पूर्व आहे.

* महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस - दादरा नगर हवेली, व गुजरात, उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, आणि दक्षिणेस - कर्नाटक व गोवा आहेत.

महाराष्ट्र - प्रशासकीय विभाग - जिल्हे [६]

] कोकण विभाग - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग

२] नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

३] पुणे विभाग - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा

४] औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर

५] अमरावती विभाग - अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम

६] नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्र प्राकृतिक

* महाराष्ट्रच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्यांद्री पर्वत, उत्तरेस सातपुडा पर्वत, आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे अहमदनगर व नाशिक या जिल्यात असून त्याची उंची १६४६ मी आहे.

* महाराष्ट्रात सुमारे ९०% भूभाग हा बेसॉल्ट म्हणजेच अग्नीजन्य खडकांनी बनलेला आहे.

* महाराष्ट्रात महाबळेश्वर, तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

* महाराष्ट्रात काळी कापसाची रेगूर मृदा ही सर्वात जास्त असून तिची सुपीकता अधिक आहे

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (महाराष्ट्रातील धरणे)


             महाराष्ट्रातील धरणे 
            धरण - नदी - जिल्हा

१] भंडारदरा - प्रवरा - अहमदनगर

२] कोयना - कोयना - सातारा

३] भाटघर - येळवंडी - पुणे

४] धोम - कृष्णा - सातारा

५] पानशेत - अंबी - पुणे

६] जायकवाडी - गोदावरी - औरंगाबाद

७] खडकवासला - मुठा - पुणे

८] बिंदुसरा - बिंदुसरा - बीड

९] मुळशी - मुळा - पुणे

१०] तानसा - तानसा - ठाणे

११] गंगापूर - गोदावरी - नाशिक

१२] मोडकसागर - वैतरणा - ठाणे

१३] चाणकपूर - गिरणा - नाशिक

१४] तोतलाडोह - पेंच - नागपूर

१५] राधानगरी - भोगावती - कोल्हापूर

१६] दारणा - दारणा - नाशिक

१७] येलदरी - पूर्णा - हिंगोली

१८] सिद्धेश्वर - पूर्णा - हिंगोली

१९] उजनी - भीमा - सोलापूर

२०] वीर - नीरा - पुणे

स्पर्धा परीक्षा उपयुक्त(महाराष्ट्र कृषी संशोधन संस्था)

महाराष्ट्र - कृषी संशोधन संस्था

* राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र - मांजरी पुणे

* हळद संशोधन केंद्र - डिग्रज सांगली

* गहू संशोधन केंद्र - महाबळेश्वर सातारा

* गवत संशोधन केंद्र - पालघर ठाणे

* सेंटर फॉर इंडियन बांबू रिसर्च अँड टेक्नॉलॉजी - कुडाळ सिंधुदुर्ग

* राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र - हिरज केगाव सोलापूर

* राष्ट्रीय कांदा लसूण केंद्र - राजगुरूनगर पुणे

* फळ प्रक्रिया संशोधन केंद्र - पालघर