Ubed Shaikh Deoni(Latur)

शनिवार, 22 मई 2021

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (समुहदर्शक शब्द-1)



📕समूहदर्शक शब्द भाग 1 बद्दल संपूर्ण माहिती📕

♦पिकण्यासाठी घातलेल्या आंब्यांची - आढी 
 
♦गव्हाची - ओंबी 
 
♦घरांची - आळी 
 
♦पणत्यांची - आरास 
 
♦तार्‍यांची - आकाशगंगा 
 
♦मडक्यांची - उतरंड 
 
♦फळझाडे व फूल झाडांचे - उपवन 
 
♦मेंढरांचा, हत्तीचा - कळप 
 
♦जहाजांचा - काफिला
 
♦वेलींचा - कुंज 
 
♦गुरांचा - कळप 
 
♦गायीचे - खिल्लार 
 
♦विद्यार्थ्यांचा - गट 
 
♦पुस्तकांचा - गठ्ठा
 
♦गवताची - गंजी 
 
♦माणसांची - गर्दी 
 
♦पालेभाजीची - गड्डी
 
♦माशांची - गाथण 
 
♦काजूची - गाथण 
 
♦फुलांचा - गुच्छ 
 
♦गाणे गाणार्‍यांचा - गानवृंद 
 
♦द्रक्षांचा, केळांचा - घड
 

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (महाराष्ट्र)



महाराष्ट्र : झलक -
महाराष्ट्र - स्थान,स्थापना,विभाग

* महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली.

* महाराष्ट्राचे कोकण, देश, मराठवाडा, विदर्भ हे चार प्रादेशिक विभाग आहेत.

* महाराष्ट्राचे स्थान पश्चिम भारतात असून अक्षांश १५.८ उत्तर ते २२.१ उत्तर, तर रेखांश ७२.६ पूर्व तर ८०.९ पूर्व आहे.

* महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस - दादरा नगर हवेली, व गुजरात, उत्तरेस - मध्य प्रदेश, पूर्वेस - छत्तीसगड, आग्नेयेस - आंध्रप्रदेश, आणि दक्षिणेस - कर्नाटक व गोवा आहेत.

महाराष्ट्र - प्रशासकीय विभाग - जिल्हे [६]

] कोकण विभाग - मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधदुर्ग

२] नाशिक विभाग - नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर

३] पुणे विभाग - पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा

४] औरंगाबाद विभाग - औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर

५] अमरावती विभाग - अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशीम

६] नागपूर विभाग - नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

महाराष्ट्र प्राकृतिक

* महाराष्ट्रच्या पश्चिमेस अरबी समुद्र पूर्वेस सह्यांद्री पर्वत, उत्तरेस सातपुडा पर्वत, आहे.

* महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे हे अहमदनगर व नाशिक या जिल्यात असून त्याची उंची १६४६ मी आहे.

* महाराष्ट्रात सुमारे ९०% भूभाग हा बेसॉल्ट म्हणजेच अग्नीजन्य खडकांनी बनलेला आहे.

* महाराष्ट्रात महाबळेश्वर, तोरणमाळ, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे आहेत.

* महाराष्ट्रात काळी कापसाची रेगूर मृदा ही सर्वात जास्त असून तिची सुपीकता अधिक आहे

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (महाराष्ट्रातील धरणे)


             महाराष्ट्रातील धरणे 
            धरण - नदी - जिल्हा

१] भंडारदरा - प्रवरा - अहमदनगर

२] कोयना - कोयना - सातारा

३] भाटघर - येळवंडी - पुणे

४] धोम - कृष्णा - सातारा

५] पानशेत - अंबी - पुणे

६] जायकवाडी - गोदावरी - औरंगाबाद

७] खडकवासला - मुठा - पुणे

८] बिंदुसरा - बिंदुसरा - बीड

९] मुळशी - मुळा - पुणे

१०] तानसा - तानसा - ठाणे

११] गंगापूर - गोदावरी - नाशिक

१२] मोडकसागर - वैतरणा - ठाणे

१३] चाणकपूर - गिरणा - नाशिक

१४] तोतलाडोह - पेंच - नागपूर

१५] राधानगरी - भोगावती - कोल्हापूर

१६] दारणा - दारणा - नाशिक

१७] येलदरी - पूर्णा - हिंगोली

१८] सिद्धेश्वर - पूर्णा - हिंगोली

१९] उजनी - भीमा - सोलापूर

२०] वीर - नीरा - पुणे

स्पर्धा परीक्षा उपयुक्त(महाराष्ट्र कृषी संशोधन संस्था)

महाराष्ट्र - कृषी संशोधन संस्था

* राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र - मांजरी पुणे

* हळद संशोधन केंद्र - डिग्रज सांगली

* गहू संशोधन केंद्र - महाबळेश्वर सातारा

* गवत संशोधन केंद्र - पालघर ठाणे

* सेंटर फॉर इंडियन बांबू रिसर्च अँड टेक्नॉलॉजी - कुडाळ सिंधुदुर्ग

* राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र - हिरज केगाव सोलापूर

* राष्ट्रीय कांदा लसूण केंद्र - राजगुरूनगर पुणे

* फळ प्रक्रिया संशोधन केंद्र - पालघर

स्पर्धा परीक्षा उपयुक्त(भारताची राष्ट्रीय प्रतीके)



🎯भारताची राष्ट्रीय प्रतीके🎯

* 🔰राष्ट्रध्वज - भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा आहे. राष्ट्रध्वजाच्या लांबी रुंदीचे प्रमाण ३:२ असे आहे. वरून खाली या क्रमाने राष्ट्रध्वजात केशरी, पांढरा, हिरवा या तीन रंगाच्या सारख्या रुंदीच्या आडव्या पट्ट्या आहेत.

* या चक्राला २४ आरे आहेत. हे अशोकचक्र सारनाथ येथील सुप्रसिद्ध सिंहशीर्ष अशोक स्तंभावरील आहे.

* भारताच्या घटनासमितीने २२ जुलै १९४७ रोजी राष्ट्रध्वजाला मान्यता दिली.

* 🔰राजमुद्रा - भारताची राजमुद्रा ही सारनाथ येथील सिंहशीर्ष अशोक स्तंभाच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेत समोरून फक्त तीनच सिंह दिसतात. आणि त्यांच्या खालच्या बाजूस मध्यावर चक्र असून घोडा, बैल, यांच्या प्रतिमा आहेत.

* ही राजमुद्रा भारत सरकारने २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारली.

* 🔰राष्ट्रगीत - रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले जण गण मण हे राष्ट्रगीत म्हणून २४ जानेवारी १९५० रोजी स्वीकृत केले. हे राष्ट्रगीत म्हणायला ५२ सेकण्ड लागतात.

* 🔰राष्ट्रीय गीत - बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीतील वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय गाण म्हणून गायले जाते.

* 🔰राष्ट्रीय पंचांग - २२ मार्च १९५७ पासून अस्तित्वात असलेले राष्ट्रीय पंचांग हे शक कालगणनेवर आधारित आहे. या पंचांगात चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून वर्षाचा प्रारंभ होतो. ग्रेग्ररियन किंवा खिस्त्री पंचांगाप्रमाणे आहे. २२ मार्च या दिवशी येतो लीप वर्ष असेल तर वर्षाचा प्रारंभ वर्षाच्या २१ मार्च रोजी येतो.

* 🔰राष्ट्रीय प्राणी - अंगावर पिवळ्या रंगाची लव व काळे पट्टे असलेला बंगाली वाघ बेंगॉल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. १९७२ पर्यंत सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता.

* 🔰राष्ट्रीय पक्षी - मयूर किंवा मोर हा देखणा पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोर भारताच्या सर्वच भागात आढळून येतो.

* 🔰राष्ट्रीय फुल - कमळ हे भारताचे राष्ट्रीय फुल आहे, कमळ हे भारतीय संस्कृती, पवित्रता, शुद्धता, याचे प्रतीक आहे.

* 🔰राष्ट्रीय फळ - आंबा हा भारताचा राष्ट्रीय फळ आहे कारण हा भारतात सर्वत्र आढळतो, आणि याचा किमान १०० जाती आहेत.

* 🔰भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (भारतातील स्मृर्तीस्थळे)



भारतातील स्मृर्तीस्थळे

*⭕ महात्मा गांधी - राजघाट, दिल्ली

* ⭕जवाहरलाल नेहरू - शांतीवन, दिल्ली

*⭕लालबहादूर शास्त्री - विजयघाट, दिल्ली

*⭕इंदिरा गांधी - शक्तिस्थळ, दिल्ली

*⭕ चरणसिंग - किसानघाट, दिल्ली

*⭕ बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी, मुंबई

*⭕ राजीव गांधी - वीरभूमी, दिल्ली

*⭕ जगजीवनराम - समतास्थळ, दिल्ली

*⭕मोरारजी देसाई - अभयघाट, अहमदाबाद

*⭕ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ, दिल्ली

*⭕यशवंतराव चव्हाण - कराड, महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जागतिक दिनविशेष)

* 💥१ जानेवारी - जागतिक धूम्रपान विरोधी दिन

*💥 ३ जानेवारी - बालिका दिन [ महाराष्ट्र ]

*💥 ४ जानेवारी - ब्रेल लिपी डे [ ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म ]

* 💥६ जानेवारी - मराठी पत्रकार दिन

* 💥९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिन

* 💥१२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन

* 💥१५ जानेवारी - भारतीय सेना दिन

*💥 २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन

* 💥२५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन

*💥 ४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन

* 💥५ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन

* 💥१० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिन

* 💥१३ फेब्रुवारी - जागतिक 

* 💥२१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

* 💥२६ फेब्रुवारी - राज्य महिला आरोग्य दिन

*💥 २७ फेब्रुवारी - जागतिक मराठी भाषा दिन

* 💥२८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

*💥 ३ मार्च - जागतिक वन्यजीव दिन

*💥 ८ मार्च - आंतराष्ट्रीय महिला दिन

* 💥१२ मार्च - समता दिन [ महाराष्ट्र ]

* 💥१२ मार्च - जागतिक किडनी दिन

* 💥१५ मार्च - जागतिक ग्राहक दिन

*💥 २० मार्च - जागतिक मौखिक आरोग्य दिन

*💥 २० मार्च - जागतिक चिमणी दिन

*💥 २१ मार्च - जागतिक वन दिन

* 💥२१ मार्च - जागतिक डाऊन सिंड्रोम दिन

*💥 २२ मार्च - जागतिक जल दिन

*💥 २३ मार्च - शहीद दिन

*💥 २४ मार्च - आंतरराष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिन

* 💥२७ मार्च - महाराष्ट्र अवयवदान दिन

*💥 ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

*💥 १४ एप्रिल - जागतिक अग्निशामक दिन

*💥 २१ एप्रिल - प्रशासकीय सेवा दिननागरी सेवा दिन

*💥 २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन

* 💥२३ एप्रिल - जागतिक ग्रंथ दिन

*💥 २३ एप्रिल - स्वामित्व हक्क दिन

*💥 २४ एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन

* 💥२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन

*💥 २९ एप्रिल - जागतिक नृत्य दिन

* 💥१ मे - जागतिक कामगार दिन

*💥 १ मे - महाराष्ट्र दिन व राजभाषा मराठी दिन

*💥 ८ मे - आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन

* 💥८ मे - जागतिक थलसेमिया दिन

*💥 १२ मे - जागतिक परिचारिका दिन

*💥 २३ मे - कासव संवर्धन दिन

* 💥२४ मे - राष्ट्रकुल दिन

*💥 २९ मे - आंतरराष्ट्रीय शांतीसेना दिन

* 💥५ जून - जागतिक पर्यावरण दिन

* 💥१२ जून - जागतिक बालकामगार दिन

*💥 १४ जून - जागतिक रक्तदाता दिन 

*💥 १५ जून - ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरूकता दिन 

*💥 १७ जून - जागतिक नापिकी व दुष्काळ दिन 

* 💥२० जून - जागतिक निर्वासित दिन 

* 💥२१ जून - जागतिक योग्य दिन 

*💥 २१ जून - जागतिक जिराफ दिन 

*💥 २३ जून - ऑलम्पिक दिन 

*💥 २६ जून - सामाजिक न्याय दिन 

*💥 ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन 

*💥 ११ जुलै - जागतिक जनगणना दिन 

*💥 १५ जुलै - जागतिक युवा कौशल्य दिन 

*💥 १९ जुलै - बँक राष्ट्रीयीकरण दिन 

*💥 २३ जुलै - राष्ट्रीय प्रसारण दिन 

* 💥२९ जुलै - जागतिक व्याघ्र दिन 

*💥 २६ जुलै - कारगिल विजय दिन 

*💥 २८ जुलै - हेपटायटिस दिन 

*💥 १ ऑगस्ट - महसूल दिन 

*💥 ९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन 

* 💥१२ ऑगस्ट -जागतिक हत्ती दिन 

*💥 १९ ऑगस्ट - जागतिक छायाचित्रकार दिन 

* 💥२० ऑगस्ट - अक्षय ऊर्जा दिन 

*💥 २० ऑगस्ट - राष्ट्रीय सदभावना दिन 

*💥 २९ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन 

*💥 २९ ऑगस्ट - शेतकरी दिन 

*💥 २ सप्टेंबर - जागतिक नारळ दिन 

* 💥५ सप्टेंबर - शिक्षक दिन 

*💥 ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 

* 💥१५ सप्टेंबर - अभियंता दिन 

*💥 १५ सप्टेंबर - दूरदर्शन दिन 

* 💥१६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 

* 💥२५ सप्टेंबर - अंत्योदय दिन 

* 💥२७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन 

*💥 २८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 

* 💥१ ऑक्टोबर - जागतिक ज्येष्ठ दिन 

*💥 २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 

*💥 ४ ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन 

*💥 ८ ऑक्टोबर - भारतीय हवाई दिन 

*💥 ११ ऑकटोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 

* 💥१७ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 

* 💥२४ ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन 

* 💥३१ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

*💥 ११ नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन 

* 💥१४ नोव्हेंबर - बालक दिन 

*💥 १४ नोव्हेंबर - बालक दिन 

* 💥१६ नोव्हेंबर - राष्ट्रीय पत्रकार दिन 

* 💥१७ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 

*💥 १९ नोव्हेंबर - जागतिक स्वछता दिन 

* 💥१९ नोव्हेंबर - शौचालय दिन 

*💥 १९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 

*💥 २१ नोव्हेंबर - जागतिक मासेमारी दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - जागतिक स्थूलता दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - राष्ट्रीय कायदा दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - राष्ट्रीय संविधान दिन 

*💥 ३ डिसेंबर - जागतिक अपंग दिन 

* 💥४ डिसेंबर - भारतीय नौदल दिन 

*💥 ५ डिसेंबर - जागतिक मृदा दिन 

*💥 ७ डिसेंबर - ध्वज दिन 

*💥 ८ डिसेंबर - सार्क संघटना दिन 

*💥 १० डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिन 

*💥 १० डिसेंबर - मानवाधिकार दिन 

*💥 १४ डिसेंबर - राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 

*💥 १६ डिसेंबर - विजय दिन 

* 💥१९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिन 

*💥 २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन 

*💥 २३ डिसेंबर - राष्ट्रीय किसान दिन 

* 💥२४ डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन 

*💥 २५ डिसेंबर - राष्ट्रीय सुप्रशासन दिन