Ubed Shaikh Deoni(Latur)

शनिवार, 22 मई 2021

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (भारतातील स्मृर्तीस्थळे)



भारतातील स्मृर्तीस्थळे

*⭕ महात्मा गांधी - राजघाट, दिल्ली

* ⭕जवाहरलाल नेहरू - शांतीवन, दिल्ली

*⭕लालबहादूर शास्त्री - विजयघाट, दिल्ली

*⭕इंदिरा गांधी - शक्तिस्थळ, दिल्ली

*⭕ चरणसिंग - किसानघाट, दिल्ली

*⭕ बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी, मुंबई

*⭕ राजीव गांधी - वीरभूमी, दिल्ली

*⭕ जगजीवनराम - समतास्थळ, दिल्ली

*⭕मोरारजी देसाई - अभयघाट, अहमदाबाद

*⭕ग्यानी झैलसिंग - एकतास्थळ, दिल्ली

*⭕यशवंतराव चव्हाण - कराड, महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जागतिक दिनविशेष)

* 💥१ जानेवारी - जागतिक धूम्रपान विरोधी दिन

*💥 ३ जानेवारी - बालिका दिन [ महाराष्ट्र ]

*💥 ४ जानेवारी - ब्रेल लिपी डे [ ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म ]

* 💥६ जानेवारी - मराठी पत्रकार दिन

* 💥९ जानेवारी - प्रवासी भारतीय दिन

* 💥१२ जानेवारी - राष्ट्रीय युवक दिन

* 💥१५ जानेवारी - भारतीय सेना दिन

*💥 २४ जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन

* 💥२५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार दिन

*💥 ४ फेब्रुवारी - जागतिक कर्करोग दिन

* 💥५ फेब्रुवारी - महाराष्ट्र राज्य मौखिक आरोग्य दिन

* 💥१० फेब्रुवारी - राष्ट्रीय जंतनाशक दिन

* 💥१३ फेब्रुवारी - जागतिक 

* 💥२१ फेब्रुवारी - आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन

* 💥२६ फेब्रुवारी - राज्य महिला आरोग्य दिन

*💥 २७ फेब्रुवारी - जागतिक मराठी भाषा दिन

* 💥२८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन

*💥 ३ मार्च - जागतिक वन्यजीव दिन

*💥 ८ मार्च - आंतराष्ट्रीय महिला दिन

* 💥१२ मार्च - समता दिन [ महाराष्ट्र ]

* 💥१२ मार्च - जागतिक किडनी दिन

* 💥१५ मार्च - जागतिक ग्राहक दिन

*💥 २० मार्च - जागतिक मौखिक आरोग्य दिन

*💥 २० मार्च - जागतिक चिमणी दिन

*💥 २१ मार्च - जागतिक वन दिन

* 💥२१ मार्च - जागतिक डाऊन सिंड्रोम दिन

*💥 २२ मार्च - जागतिक जल दिन

*💥 २३ मार्च - शहीद दिन

*💥 २४ मार्च - आंतरराष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन दिन

* 💥२७ मार्च - महाराष्ट्र अवयवदान दिन

*💥 ७ एप्रिल - जागतिक आरोग्य दिन

*💥 १४ एप्रिल - जागतिक अग्निशामक दिन

*💥 २१ एप्रिल - प्रशासकीय सेवा दिननागरी सेवा दिन

*💥 २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन

* 💥२३ एप्रिल - जागतिक ग्रंथ दिन

*💥 २३ एप्रिल - स्वामित्व हक्क दिन

*💥 २४ एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन

* 💥२५ एप्रिल - जागतिक हिवताप दिन

*💥 २९ एप्रिल - जागतिक नृत्य दिन

* 💥१ मे - जागतिक कामगार दिन

*💥 १ मे - महाराष्ट्र दिन व राजभाषा मराठी दिन

*💥 ८ मे - आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन

* 💥८ मे - जागतिक थलसेमिया दिन

*💥 १२ मे - जागतिक परिचारिका दिन

*💥 २३ मे - कासव संवर्धन दिन

* 💥२४ मे - राष्ट्रकुल दिन

*💥 २९ मे - आंतरराष्ट्रीय शांतीसेना दिन

* 💥५ जून - जागतिक पर्यावरण दिन

* 💥१२ जून - जागतिक बालकामगार दिन

*💥 १४ जून - जागतिक रक्तदाता दिन 

*💥 १५ जून - ज्येष्ठ नागरिक अत्याचार विरोधी जागरूकता दिन 

*💥 १७ जून - जागतिक नापिकी व दुष्काळ दिन 

* 💥२० जून - जागतिक निर्वासित दिन 

* 💥२१ जून - जागतिक योग्य दिन 

*💥 २१ जून - जागतिक जिराफ दिन 

*💥 २३ जून - ऑलम्पिक दिन 

*💥 २६ जून - सामाजिक न्याय दिन 

*💥 ११ जुलै - जागतिक लोकसंख्या दिन 

*💥 ११ जुलै - जागतिक जनगणना दिन 

*💥 १५ जुलै - जागतिक युवा कौशल्य दिन 

*💥 १९ जुलै - बँक राष्ट्रीयीकरण दिन 

*💥 २३ जुलै - राष्ट्रीय प्रसारण दिन 

* 💥२९ जुलै - जागतिक व्याघ्र दिन 

*💥 २६ जुलै - कारगिल विजय दिन 

*💥 २८ जुलै - हेपटायटिस दिन 

*💥 १ ऑगस्ट - महसूल दिन 

*💥 ९ ऑगस्ट - जागतिक आदिवासी दिन 

* 💥१२ ऑगस्ट -जागतिक हत्ती दिन 

*💥 १९ ऑगस्ट - जागतिक छायाचित्रकार दिन 

* 💥२० ऑगस्ट - अक्षय ऊर्जा दिन 

*💥 २० ऑगस्ट - राष्ट्रीय सदभावना दिन 

*💥 २९ ऑगस्ट - राष्ट्रीय क्रीडा दिन 

*💥 २९ ऑगस्ट - शेतकरी दिन 

*💥 २ सप्टेंबर - जागतिक नारळ दिन 

* 💥५ सप्टेंबर - शिक्षक दिन 

*💥 ८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 

* 💥१५ सप्टेंबर - अभियंता दिन 

*💥 १५ सप्टेंबर - दूरदर्शन दिन 

* 💥१६ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 

* 💥२५ सप्टेंबर - अंत्योदय दिन 

* 💥२७ सप्टेंबर - जागतिक पर्यटन दिन 

*💥 २८ सप्टेंबर - आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 

* 💥१ ऑक्टोबर - जागतिक ज्येष्ठ दिन 

*💥 २ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 

*💥 ४ ऑक्टोबर - जागतिक प्राणी दिन 

*💥 ८ ऑक्टोबर - भारतीय हवाई दिन 

*💥 ११ ऑकटोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 

* 💥१७ ऑक्टोबर - आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 

* 💥२४ ऑक्टोबर - जागतिक पोलिओ दिन 

* 💥३१ ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

*💥 ११ नोव्हेंबर - राष्ट्रीय शिक्षण दिन 

* 💥१४ नोव्हेंबर - बालक दिन 

*💥 १४ नोव्हेंबर - बालक दिन 

* 💥१६ नोव्हेंबर - राष्ट्रीय पत्रकार दिन 

* 💥१७ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन 

*💥 १९ नोव्हेंबर - जागतिक स्वछता दिन 

* 💥१९ नोव्हेंबर - शौचालय दिन 

*💥 १९ नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पुरुष दिन 

*💥 २१ नोव्हेंबर - जागतिक मासेमारी दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - जागतिक स्थूलता दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - राष्ट्रीय कायदा दिन 

* 💥२६ नोव्हेंबर - राष्ट्रीय संविधान दिन 

*💥 ३ डिसेंबर - जागतिक अपंग दिन 

* 💥४ डिसेंबर - भारतीय नौदल दिन 

*💥 ५ डिसेंबर - जागतिक मृदा दिन 

*💥 ७ डिसेंबर - ध्वज दिन 

*💥 ८ डिसेंबर - सार्क संघटना दिन 

*💥 १० डिसेंबर - जागतिक मानवी हक्क दिन 

*💥 १० डिसेंबर - मानवाधिकार दिन 

*💥 १४ डिसेंबर - राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 

*💥 १६ डिसेंबर - विजय दिन 

* 💥१९ डिसेंबर - गोवा मुक्ती दिन 

*💥 २२ डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन 

*💥 २३ डिसेंबर - राष्ट्रीय किसान दिन 

* 💥२४ डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन 

*💥 २५ डिसेंबर - राष्ट्रीय सुप्रशासन दिन

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जगातील देश व खंड) कशास काय म्हणतात?




* आफ्रिका - काळे खंड

* ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप

* बहरीन - मोत्यांची बेटे

* बेल्जीयम - युरोपची रणभूमी

* कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश

* क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार

* इजिप्त - नाईलची देणगी

* नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश

* फिनलँड - सरोवराचा देश

* म्यानमार - पॅगोडाचा देश

* जपान - उगवत्या सूर्याचा देश

* झांझिबार - लवंगाचे बेट

* न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड

* पॅलेस्टाईन - पवित्र भूमी

* आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे

* रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

* स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण

* थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश

* बाल्कन देश - युरोपचा सुरुंग

* त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट

* अमेरिका - सूर्यास्ताचा देश

* जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड

* प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार

* युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जगातील शहरे व नद्या) कशास काय म्हणतात?


🦋जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात? 🦋

*🎯हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु

*🎯गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी

*🎯रोम शहर - सात टेकड्यांचे शहर

*🎯ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी

*🎯व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी

*🎯पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे

*🎯सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '

*🎯बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार

*🎯 डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर

*🎯 अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे

*🎯 बेलग्रेड शहर - श्वेत शहर

*🎯शिकागो शहर - उद्यानाचे शहर

*🎯 जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली

*🎯 ल्हासा शहर - निषिद्ध शहर

*🎯न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर

*🎯 स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जगातील मानवनिर्मित आश्चर्ये)



मानवनिर्मित आश्चर्ये

* ♦इजिप्त मधील पिरॅमिड - इसवी पूर्व २७०० ते २५०० पाहिले इजिप्तच्या प्राचीन राज्यांनी फॅरो अनेक थडगी पिरॅमिट्स नाईल नदीच्या काठी आहेत. त्यापैकी कैरोजवळ नाईलच्या पश्चिम तीरावरील गिझा येथे प्रचंड पिरॅमिड आहेत. यातील सर्वात मोठा पिरॅमिड खुफूचा पिरॅमिड आहे. त्याने १३ एकर जागा व्यापली आहे.

*♦ बॅबिलॉन इराक येथील तरंगता बगीचा - प्राचीन मॅसोपोटोमियाचा खाल्डिन राजा दुसरा नेबूचाडनेझार याने आपल्या राजवाड्याच्या ४०० बाय ४०० फूट मापाच्या चौरस गच्चीवर तरंगता व झुलता बगीचा बांधला तो ७५ फूट उंचीवर होता.

* ♦अलेक्झांड्रिया बंदराजवळील दीपगृह - राजा दुसरा टॉलेमी यांनी फॅरोस बेटावर हे संगमररी दीपगृह बांधले. याची उंची १२२ मीटर होती. आज हे दीपगृह अस्तित्वात नाही कारण ते भूकंपामुळे नष्ट झाले.

* ♦ऱ्होड्स बेटावरील प्रचंड पुतळा - भूमध्य समुद्रातील ऱ्होड्स नावाच्या एक ग्रीक बेटावरील अपोलो या ग्रीक सूर्यदेवाचा ब्राँझ धातूचा पुतळा चेरेस या शिल्पकाराने बनविला होता.

*♦ इफेसस - आजच्या तुर्कस्तानातील अर्टेमिस या ग्रीक देवीचे भव्य मंदिर आर्टेमिस किंवा डायना देवीचे भव्य संगमवारी मंदिर आहे. सुमारे १८ मी उंच व छप्पर लाकडी होते.

* ♦हेलीकर्णासस - तुर्कस्तान येथील भव्य कबर - प्राचीन आशिया मायनरमधील कारियाचा राजा मॉसेलस याच्या मृत्यूनंतर त्याची राणी आर्टेमिसिया हिने राजाची ही भव्य कबर खोदली.

*♦ झ्यूस - प्राचीन ग्रीसमधील ऑलम्पिया येथील झ्यूस या ग्रीक देवाचा सिंहासनावर बसलेला सुमारे ४० फूट उंचीचा हा पुतळा फिडियस या शिल्पकाराने बनविला आहे. सोने व हस्तिदंत या पुतळ्यात समाविष्ट आहे.

* ♦चीनची भिंत - शी हवांग टी या चिनी सम्राटाने मंगोल आक्रमणापासून चीनचे रक्षण व्हावे म्हणून बांधलेली २४१५ किमीची जगातील सर्वात लांब भिंत. उंची सुमारे २२ फूट, जाडी सुमारे २० फूट.

* ♦स्टोन हेंज - सॅलिबरी मैदान येथील प्राचीन अनेक टन वजनाच्या शिळांची वर्तुळाकृती रचना.

* ♦कलोसियम - प्राचीन रोममधील भव्य खुले प्रेक्षागार व रंगमंच. यात सुमारे ४५,००० प्रेक्षकांची बसण्याची व
५००० प्रेक्षकांची उभे राहण्याची सोय होती. सम्राट टायसन यांनी हे बांधकाम केले होते.

*♦ स्फिक्स - ईजिप्तमधील गिझा येथील पिरॅमिडसमोरील मानवी शीर्ष व सिंहाचे शरीर असलेला आणि एकाच सलग पाषणातून कोरलेला १६० फूट लांब व ७० फूट उंच पुतळा. 

*♦ नानकिंग मनोरा - चीनच्या इतिहासातील राजधानी नानकिंग येथे असलेला हा मनोरा चिनी मातीचा आहे. 

* ♦पिसाचा झुकता मनोरा - इटलीतील पिसा येथे हा सुप्रसिद्ध मनोरा जो बांधकाम करत असताना काही दोषामुळे कलू लागला तर त्याचा तोल साधत त्याचे बांधकाम सुरू ठेवले. त्यामुळे हा झुकता बनला. 

* ♦अंगकोर मंदिर - कंबोडियातील मंदिर पहिला धरणीद्रवर्मन व दुसरा सूर्यववर्मन यांच्या कारकिर्दीत विष्णूचे भव्य मंदिर. 

*♦ ताजमहाल - मोघल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मुर्तीप्रित्यर्थ ही वास्तू बांधली. आग्रा येथे यमुना नदीच्या ठिकाणी संपूर्ण पांढऱ्या संगमवरी दगडात बांधली आहे. 

*♦ श्वेन डेगॉन पॅगोडा - म्यानमारची राजधानी यांगोनजवळील ही वस्तू म्हणजे बौद्ध मंदिर आहे. ९८ मीटर उंचीचे असून ते सोन्याचे मढवलेले आहे. व या मंदिरात भगवान बुद्धाचे आठ केस जतुन ठेवले आहे. 

*♦ भूमिगत कब्रस्तान - इटलीच्या रोम शहरात हे आरंभीच्या ख्रिस्ती धर्मियांचे कबरस्थान आहे. 

* ♦हॅगिया सोफिया चर्च - रोमन सम्राट काँस्टंन्तीन याने हे चर्च बांधले हे भव्य चर्च तुर्कस्तानातील इस्तंबूल येथे आहे. भव्य घुमट हे या वास्तूचे वैशिष्ट्य आहे. 

*♦ अल्हाम्ब्रा राजवाडा - अरबांनी स्पेनमधील आपल्या वर्चस्वाच्या काळात ग्रानाडा येथे अल अहमद या मूर सुलतानाने हा किल्लासदृश्य राजवाडा बांधला.

स्पर्धा परीक्षा उपयुक्त (जगातील निसर्ग निर्मित आश्चर्ये)

निसर्गनिर्मित आश्चर्ये

 * ग्रॅन्ड कॅन्यन - अमेरिकेतील ऍरिझोना राज्यात ग्रॅन्ड कॅन्यन ही जगातील सर्वात लांब घळई आहे. ही घळई ४६६ किमी लांब, १८३ मिटर, २९ किमी रुंद व १.६ किमी खोल आहे, या घळईतून कोलोरॅडो नदी वाहत जाते. 

* सहारा वाळवंट - सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठ वाळवंट आहे. ते आफ्रिकेच्या उत्तर भागात आहे. त्याचा विस्तार जवळपास भूमध्य समुद्र व ऍटलास पर्वत ते दक्षिणेस चाड सरोवरापर्यंत आहे. २२५० किमी व ५००० किमी त्याचा विस्तार आहे. पृथ्वीवरील सर्वात जास्त प्रकाश मिळवणारा असा हा प्रदेश आहे. 

* माउंट एव्हरेस्ट - हे जगातील सर्वात मोठे उंच पर्वत शिखर ते नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर हिमालय पर्वतरांगेत आहे. सर्वे ऑफ इंडियानुसार याशिखराची उंची २९००२ फूट एवढी मोजून, हे जगातील सर्वोच असल्याने जाहीर केले. [ ८८४८ मीटर ] ठरवली आहे. सगरमाथा म्हणजे स्वर्गातील सर्वोच बिंदू हे याचे भरतीय नाव आहे. 

* सारावाह चेंबर - सरावाक चेम्बर ही जगातील सर्वात मोठी भूयारी गुन्हा असून ती मलेशियातील सरावाक प्रांतात आहे. 
या गुहेचा शोध १९८० मध्ये लागला. 

* ग्रेट बॅरिअर रिफ - ग्रेट बॅरिअर रिफ ही ऑस्ट्रेलियातील ईशान्य किनाऱ्याजवळ असणारी पॅसिफिक महासागरातील प्रवाळद्वीपाची मोठी रांग माळ आहे. ही रंग २०२७ किमी पर्यंत पसरली आहे. या बेटावरील सूक्ष्मजीवांना पॉलीप म्हणतात. 

* मौना लोआ - मौना लोआ म्हणजे हा जगातील सर्वात मोठा जागृत ज्वालामुखी आहे. तो पॅसिफिक महासागरातील हवाई बेटात आहे. याची उंची ४१७० मीटर असून ज्वालामुखीचा विस्तार १० चौरस किमी व खोली १८० मीटर आहे. 

* एन्जल धबधबा - हा जगातील सर्वात उंच धबधबा असून तो दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला देशातील गयाना उच्च प्रदेशात डोंगराळ भागात आहे. त्याची उंची ९७९ मीटर आहे

गुरुवार, 7 जनवरी 2021

म्हणी व अर्थ Ubed Shaikh Deoni, Latur.

〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓〓 
        ┎═══════════┒
         ▌ ✺स्पर्धा परीक्षा✺    ▌
        ┗═══════════┛
              🪐म्हणी व अर्थ🪐
 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 

🔰निंदकाचे घर असावे शेजारी -➡ निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्याच्यामुळे आपले दोष आपल्याला कळतात. 
 
🔰पळसाला पाने तीनच ➡- सगळीकडे परिस्थिती एक सारखीच असणे.
 
🔰पर दु:ख शीतळ ➡- दुसर्‍याच्या दु:खाची खरी कल्पना येत नाही.  

🔰पदरी पडले खोड हसून करावे गोड ➡- स्वीकारलेल्या गोष्टीला नाव न ठेवता हसून समाधान माणने 
 
🔰पडत्या फळाची आज्ञा - आपल्या समोरील प्रसंग शिरसावंद्य माणून काम करणे. 
 
🔰पाचमुखी परमेश्वर ➡- बहुसंख्य लोक म्हणतील ते खरे मानावे. 
 
🔰पाचही बोटे सारखी नसतात -➡ सर्व माणसे सारख्या स्वभावाची किंवा सारख्याच कर्तुत्वाची नसतात. 

🔰प्रयत्नांती परमेश्वर ➡- कितीही कठीण गोष्ट असली तरी अथक प्रयत्नानंतर ती साध्य होते म्हणून नेहमी प्रयत्न सुरू ठेवावे. 
 
🔰पालथ्या घड्यावर पाणी ➡- एखाद्याला केलेला उपदेश वाया जाणे. 
 
🔰पाप्याला पंढरपूर आळशेल्याला गंगादूर - ➡श्रद्धा नसेल तर परमेश्वर प्राप्ती होत नाही. 
 
🔰पाय धू तर म्हणे तोंड केवढ्याचे -➡ सांगितलेले काम सोडून नको त्या गोष्टी करणे.

🔰प्राणावर आले होते:पण शेपटावर निभावले - ➡जिवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात वाचने. 

🔰पायाची वहाण पायीच बरी -➡ एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा अधिक महत्व देऊ नये. 
 

🔰ळणार्‍याला एक वाट तर शोधणार्‍याल बारा वाटा ➡- लबाडी करणे फार सोपे पण ती शोधून काढणे खूप कठीण असते. 
 
🔰पडलेले शेण माती घेऊन उठते -➡ चांगल्या माणसावर काही तरी ठपका आला आणि त्याने त्याचे कितीही जारी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच.

 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
          संकलन-
✍️🅤 🅑 🅔 🅓 
 🅢 🅗 🅐 🅘 🅚 🅗
  🅓 🅔 🅞 🅝 🅘 
(🅛 🅐 🅣 🅤 🅡 ) ✍️

〓〓〓〓〓🅜 🅢 🅟〓〓〓〓 〓